Watch Video Dainik Gomantak
देश

Watch Video: बंगालमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार, हुगळीत मिरवणुकीत दोन गटांमध्ये हाणामारी आणि जाळपोळ

या मिरवणुकीत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोषही सहभागी झाले होते.

Pramod Yadav

पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान पुन्हा एकदा हिंसक हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. हुगळीत रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक आणि जाळपोळ झाल्याची घटना समोर आलीय. हुगळीच्या रिश्रामध्ये हिंदू संघटना मिरवणूक काढत असल्याचे सांगण्यात येत आहे.

या मिरवणुकीत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोषही सहभागी झाले होते. दिलीप घोष गेल्यानंतर अचानक दोन गटांमध्ये हाणामारी सुरू झाली. हिंसाचाराच्या वेळी हल्लेखोरांनी जाळपोळीची घटनाही झाली. दरम्यान, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

भाजप, विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदू संघटनांनी या रॅलीचे आयोजन केले होते. चंदननगर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त अमित जबलगीर अतिरिक्त पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी रवाना झाले आहेत. या हल्ल्यात आमदार विमान घोष जखमी झाल्याचा दावा भाजपने केला आहे.

या दगडफेकीत अनेक पोलीस जखमीही झाले आहेत. शोभा यात्रा रिश्राच्या संध्याबाजार परिसरातून जात असताना ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, हा भाग अल्पसंख्याकबहुल आहे.

शोभा यात्रेत महिला आणि लहान मुलांवर दगडफेक झाल्याचा आरोप भाजप नेते दिलीप घोष यांनी केला आहे.

हावडा येथील हिंसाचारानंतरही राज्य सरकार कोणतीही कारवाई करत नाही. दगडफेक आणि वाहनांची तोडफोड केली जात आहे. दिलीप घोष रात्री 8.30 वाजता या विषयावर पत्रकार परिषद घेणार आहेत.

टीएमसीचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले की, हुगळीत जे घडली ती हावडासारखेच आहे. भाजप पूर्वनियोजित पद्धतीने दंगली भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही अधिक तपशील शोधत आहोत. भाजप नेते सुकांत आणि दिलीप घोष यांच्यात कोण अधिक दंगल भडकावू शकते याची स्पर्धा आहे.

तत्पूर्वी, पश्चिम बंगालमधील हावडा येथे रामनवमीच्या मिरवणुकीनंतर सलग दोन दिवस झालेल्या अशांततेनंतर शिबपूर परिसरातील परिस्थिती आणखीनच बिघडली. अनेक तास इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. हावडा जिल्ह्यातील काजीपारा भागात रामनवमी उत्सवादरम्यान विश्व हिंदू परिषद आणि बंजर्ग दलाने मिरवणूक काढली. या हिंसाचारात अनेक वाहने जाळण्यात आली. दगडफेकही झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

SCROLL FOR NEXT