Army to Deploy One Force One Area Security Strategy Manipur:
मणिपूरमध्ये गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. तेथे गेल्या दोन आठवड्यापासून हिंसाचार आटोक्यात आला होता. मात्र, गुरूवारी येथे पुन्हा हिंसाचार झाला. त्यानंतर लष्कराने मणिपरमध्ये 'वन फोर्स वन एरिया' हे धाोरण अवलंबण्याचा निर्णय निर्णय घेतला आहे.
आता इंफाळ खोऱ्याच्या लष्कराच्या प्रत्येक दलाला एका परिसराची जबाबदारी देण्यात येणार आहे. यातून हिंसाचारावर नियंत्रण ठेवत दंगलखोरांनाही धडा शिकवणे शक्य होणार आहे.
जाळपोळ करण्याच्या उद्देशाने दुसरीकडे जात असतानाचअनेकांच्या हत्या होत आहेत. घरे जाळण्याचा प्रयत्न करणार्या कुकींच्या जमावाला मेईतेई जमावाने प्रत्युत्तर दिल्याने गुरुवारी दोन मेईतेती नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना ह्रोथेल घडली. मेईतेईंचे हल्ले ही काही कुकींनी दुसर्या भागातील मेईतेईंची घरे जाळण्याचा प्रयत्न केल्याचा परिणाम आहे. हे एक चक्र आहे जे आम्ही एक मजबूत बफर झोन राखून तोडण्याचा प्रयत्न करीत आहोत.लष्कराचे वरिष्ठ अधिकारी
मणिपूरच्या खोऱ्यामध्ये सातत्याने होत असलेली हिंसा लक्षात घेता, जेथे खोऱ्याला टेकड्या मिळतात त्या भागात बफर झोन तयार करण्याचा निर्णय घेतला होता जेणेकरून खोऱ्यातील लोकांना टेकड्यांकडे जाण्यापासून रोखता येईल.
पश्चिम इम्फाळमधील कांगपोकपी सीमेवरील गुरुवारच्या घटनेने किमान दोन नागरिकांचा मृत्यू झाला आणि मागील काही दिवसांत जाळपोळीच्या काही घटनांनी सुरक्षा व्यवस्थेतील त्रृटी उघड केल्या.
One Foce One Are धोरणामुळे कमांड आणि कंट्रोल स्ट्रक्चर मजबूत होईल. तसेच राज्यातील मालवाहतुकीचे व्यवस्थापन सुलभ होईल. जर बिष्णुपूर आणि चुराचंदपूर जिल्हे बीएसएफला दिले तर, तेथील चुकांसाठी ते एकटेच जबाबदार असतील. त्यामुळे तत्पर राहतील.दुसरीकडे कमांडर्सना जमिनीवर सैन्य ठेवणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे सोपे होईल कारण संपूर्ण क्षेत्रासाठी एकच कमांड स्ट्रक्चर असेल. सध्या फक्त समन्वयासाठीच खूप वेळ जात आहे. त्यामुळे या धोरणाचा हिंसाचारासह राज्यातील परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी फायदा होईल.लष्कराचे अधिकारी
सध्या मणिपूरमध्ये केंद्रीय सशस्त्र दलाचे 40,000 कर्मचारी आहेत. यामध्ये आसाम रायफल्स, भारतीय लष्कर, बीएसएफ, सीआरपीएफ, एसएसबी आणि आयटीबीपी यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील सीमावर्ती भागात, सध्या या सर्व सैन्याचे जवणांचे एकत्र फथक तैनात आहे. त्यामुळे होणाऱ्या हिंसाचारा किंवा घटनेसाठी एकाच दलाला जबाबदार धरता येत नाही.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, यांनी शुक्रवारी बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग शहरातील विस्थापितांच्या दोन शिबिरांना भेट दिली. सकाळी 9.30 वाजता गांधी हेलिकॉप्टरने मोइरांग येथे पोहोचले. त्यांनी येथील बाधितांची भेट घेऊन त्यांचे गाऱ्हाने ऐकून घेतले. राहुल यांनी भेट दिलेल्या दोन छावण्यांमध्ये सुमारे 1000 लोक राहत असल्याचेलसूत्रांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.