Armed robbers robbed a Punjab National Bank Manipur. Dainik Gomantak
देश

Viral Video: बॅंक बंद करण्याची तयारी सुरू असताना धडकले सशस्त्र दरोडेखोर अन् मारला 19 कोटींवर डल्ला

PNB BANK Manipur: याआधी जुलै महिन्यात चुरचंदपूर येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या (Axis Bank) शाखेतून सशस्त्र टोळीने एक कोटी रुपये लुटले होते. मेईतेई आणि कुकी (Kuki) समुदायांमधील संघर्षामुळे मणिपूर या वर्षी बराच काळ अशांत राहिले आहे.

Ashutosh Masgaunde

Armed robbers robbed a Punjab National Bank branch in Ukhrul town of Manipur and looted Rs 18.85 crore:

मणिपूरमधील उखरुल शहरात गुरुवारी पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) शाखेत चोरीची मोठी घटना घडली. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात सशस्त्र दरोडेखोरांनी उखरुल येथील पीएनबी शाखेवर दरोडा टाकून 18.85 कोटी रुपये लुटले.

पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने सांगितले की, दुपारी 8 ते 10 सशस्त्र लोकांनी उखरूल शहरातील व्ह्यूलँड-1 येथे असलेल्या पीएनबी बँकेच्या शाखेवर हल्ला केला. ते म्हणाले की, ज्यावेळी दरोडेखोरांनी बँकेवर हल्ला केला तेव्हा कर्मचारी दिवसभराच्या व्यवहारानंतर पैसे मोजत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅंकेत घुसल्यानंतर सशस्त्र दरोडेखोर पैसे मोजत असलेल्या कर्मचाऱ्यांकडे आले आणि 18.85 कोटी रुपये लुटले. मुखवटा घातलेल्या पुरुषांकडे अत्याधुनिक शस्त्रे होती आणि त्यांनी सुरक्षा कर्मचारी आणि PNB शाखेच्या कर्मचार्‍यांना ताब्यात घेतले.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, 'सुरक्षा कर्मचारी आणि बँक कर्मचाऱ्यांना बंदुकीच्या जोरावर दोरीने बांधले गेले आणि रोख रक्कम घेऊन पळून गेलेल्या सशस्त्र लोकांनी स्टोअर रूमला बंद केले.'

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा दल तातडीने घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी बँक प्राधिकरणाने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

वृत्तानुसार, बँकेत एवढा मोठा दरोडा पडल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या भीषण घटनेनंतर सुरक्षा दलांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे.

मणिपूरमध्ये ७ महिन्यांपूर्वी उसळलेल्या जातीय हिंसाचारानंतर पहिल्यांदाच एवढी मोठी चोरीची घटना उखरुल शहरात घडली आहे.

याआधी जुलै महिन्यात चुरचंदपूर येथील अॅक्सिस बँकेच्या (Axis Bank) शाखेतून सशस्त्र टोळीने एक कोटी रुपये लुटले होते. मेईतेई आणि कुकी (Kuki) समुदायांमधील संघर्षामुळे मणिपूर या वर्षी बराच काळ अशांत राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 Cricket: 19 वर्षांच्या पोरानं उडवली कांगारुंची झोप! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात घडवला इतिहास; नावावर केला मोठा रेकॉर्ड!

Cyber Fraud: सारवी, कविता, दिनाज, जास्मिन... चौघींच्या प्रेमात 80 वर्षीय मुंबईकर कंगाल, 9 कोटींना घातला गंडा

Viral Video: अजब फॅशन! महिलेने जिवंत बेडकाचे बनवले 'नेकलेस', व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण; तुम्ही पाहिलाय का?

IND vs AUS: भारताचा 'क्लीन स्वीप'! शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात शेफालीची खेळी ठरली व्यर्थ; कांगारुंनी मारली बाजी

Crime News: माणुसकीला काळिमा फासणारी घटना! 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; आरोपींच्या क्रूर कृत्याने हादरले उत्तराखंड

SCROLL FOR NEXT