
Kwena Maphaka Record: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 17 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली असली, तरी त्यांच्या 19 वर्षीय युवा गोलंदाज क्वेना मफाका याने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर पहिल्यांदाच गेलेल्या क्वेनाने पहिल्याच सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
दरम्यान, डाविनच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात मफाकाने 4 षटकांच्या गोलंदाजीत केवळ 20 धावा देत 4 महत्त्वपूर्ण बळी घेतले. या कामगिरीसह तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) टी-20 सामन्यात 4 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला खेळाडू बनला. याआधी कोणत्याही दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध असा पराक्रम करता आला नव्हता.
19 वर्षे आणि 124 दिवसांच्या वयात 4 बळी घेणाऱ्या मफाकाने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. तो क्रिकेट जगतातील 'फुल मेंबर्स' (Full Members) संघांमध्ये टी-20 सामन्यात 4 बळी घेणारा सर्वात तरुण वेगवान गोलंदाज बनला. मफाकाने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत एकूण 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 10 बळी घेतले आहेत. या सामन्यात क्वेना व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेसाठी कागिसो रबाडानेही 2 बळी घेतले होते.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) फलंदाजांनी खराब प्रदर्शन केले, ज्यामुळे संघाला विजय मिळवता आला नाही. मात्र, या पराभवातही क्वेना मफाकासारख्या युवा गोलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी दक्षिण आफ्रिकेसाठी एक सकारात्मक बाब ठरली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.