Arjun Tendulkar Dainik Gomantak
देश

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Duleep Trophy 2025: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा आणि उदयोन्मुख क्रिकेटर अर्जून तेंडुलकर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे.

Sameer Amunekar

बातमीतील ४ महत्त्वाचे मुद्दे

  • अर्जून तेंडुलकरची दुलीप ट्रॉफीतून डच्चू

  • साखरपुड्यानंतर धक्का

  • पूर्वीची दमदार कामगिरी

  • कारकीर्द

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि उदयोन्मुख क्रिकेटर अर्जून तेंडुलकर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अलीकडेच अर्जूनचा आणि प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोक हिचा साखरपुडा पार पडला होता. या आनंददायी प्रसंगानंतर क्रिकेटविश्वातील सर्वांचे लक्ष अर्जूनकडे लागले होते. मात्र या आनंदावर विरजण घालणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

28 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या देशांतर्गत पातळीवरील महत्त्वाच्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी अर्जूनची निवड करण्यात आलेली नाही. भारतीय संघातील अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत असताना अर्जूनला मात्र डच्चू मिळाल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.

अर्जून देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याचं प्रतिनिधित्व करतो. त्याला नॉर्थ इस्ट झोनकडून संधी मिळण्याची अपेक्षा होती, परंतु निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखवला नाही.

नॉर्थ इस्ट झोनचं नेतृत्व रोंगसेन जोनाथन करणार असून 28 ऑगस्टला त्यांचा पहिला सामना सेंट्रल झोन विरुद्ध रंगणार आहे. यामुळे अर्जूनसाठी ही मोठी निराशाजनक बाब ठरली आहे.

अर्जूनने गेल्या हंगामात रणजी ट्रॉफीत उत्कृष्ट कामगिरी केली होती. प्लेट ग्रुपमधील 4 सामन्यांत त्याने तब्बल 16 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच 2022-23 हंगामात गोव्याकडून पदार्पण करतानाच त्याने फर्स्ट क्लास सामन्यात शतक ठोकत जोरदार एन्ट्री केली होती. आत्तापर्यंतच्या फर्स्ट क्लास कारकिर्दीत अर्जूनच्या नावावर 37 विकेट्स आणि 532 धावा नोंदवल्या आहेत.

अर्जूनला दुलीप ट्रॉफीत स्थान मिळेल, अशी सर्वांना खात्री होती. मात्र निवड समितीने वेगळा निर्णय घेतल्याने अर्जूनला मोठा धक्का बसला आहे. अर्जूनला सातत्यपूर्ण खेळ आणि परफॉर्मन्सद्वारेच स्वतःचं स्थान मजबूत करावं लागणार आहे.

प्रश्न १ : अलीकडे अर्जून तेंडुलकर कोणत्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत होता?
उत्तर : अर्जून तेंडुलकरचा आणि प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोक हिचा साखरपुडा पार पडल्यामुळे तो चर्चेत होता.

प्रश्न २ : कोणत्या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी अर्जूनची निवड झाली नाही?
उत्तर : 28 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या देशांतर्गत दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी अर्जूनची निवड झाली नाही.

प्रश्न ३ : अर्जूनने रणजी ट्रॉफीच्या मागील हंगामात कशी कामगिरी केली होती?
उत्तर : प्लेट ग्रुपमधील 4 सामन्यांत अर्जूनने तब्बल 16 विकेट्स घेतल्या होत्या आणि पदार्पण सामन्यात शतक झळकावलं होतं.

प्रश्न ४ : आत्तापर्यंतच्या फर्स्ट क्लास कारकिर्दीत अर्जूनच्या नावावर किती धावा आणि विकेट्स आहेत?
उत्तर : अर्जूनच्या नावावर एकूण 37 विकेट्स आणि 532 धावा आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'तो' शेवटचा चेंडू ठरला आयुष्यातील अंतिम क्षण; हृदयविकाराच्या झटक्याने गोलंदाजाचा मैदानावरच मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO

Ranji Trophy: गोवा संघाशी भिडणार IPLचा शतकवीर; पर्वरीत रंगणार सामना; रणजी सामन्यात चंदीगडचे आव्हान

Mayem Lake: ‘या...या, मया या’ गाण्यामुळे प्रसिद्ध झालेल्या तलावाकडे पर्यटकांची पाठ! 10 कोटींचा खर्च पाण्‍यात; बससेवासुद्धा बासनात

बिष्णोई गँगची माणसं आहे! दारूच्या नशेत तंगाट पर्यटकांचा कळंगुट येथील हॉटेलमध्ये राडा; पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप

Kadamba Bus: याचिकेने आणली ‘कदंब’ला जाग! आसगाव–म्हापसा मार्गावर अतिरिक्त बस सुरू; सुनावणीनंतर उचलले पाऊल

SCROLL FOR NEXT