Apache Helicopter Landing Dainik Gomantak
देश

Apache Helicopter Emergency Landing: हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे शेतात एमर्जन्सी लँडिंग, पाहा व्हिडिओ

मध्य प्रदेशमधील भिंडमध्ये हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे

दैनिक गोमन्तक

 IAF Apache Helicopter Precautionary Landing:  मध्य प्रदेशमधील भिंडमध्ये हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर टेक ऑफ करताना काही तांत्रिक बिघाड झाला, त्यानंतर ते एका शेतात उतरवण्यात आले. माहिती मिळताच भिंड पोलीस घटनास्थळी पोहोचले.

भारतीय हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली की मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील जखनौली गावाजवळील सिंध नदीच्या खोऱ्यातील एका शेतात अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आले आहे. पायलटच्या प्रसंगावधान साधत एक मोठी दुर्घटना टळली आहे.

  • पायलट सुरक्षित

भारतीय वायुसेनेच्या अपाचे हेलिकॉप्टरने मध्य प्रदेशातील भिंडमधील जखनौली गावाजवळील सिंध नदीच्या खोऱ्यात आपत्कालीन लँडिंग केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

भिंडच्या नयागाव परिसरात एक लढाऊ हेलिकॉप्टर येथे दाखल झाले आहे. प्रशिक्षण मोहिमेवर असलेल्या अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरचे क्रॅश लँडिंग झाले. पायलट सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

AH-64 Apache जगातील सर्वात प्रगत मल्टीरोल लढाऊ हेलिकॉप्टर

AH-64 Apache हे जगातील सर्वात प्रगत मल्टी-रोल कॉम्बॅट हेलिकॉप्टर आहे. भारतीय हवाई दलाकडे 22 AH-64E अपाचे अटॅक हेलिकॉप्टर आहेत. 2020 मध्ये, बोईंगने भारतीय लष्करासाठी आणखी सहा अपाचे हेलिकॉप्टर घेण्याचा करार केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Jatra 2026: श्री देव बोडगेश्वराच्या जत्रोत्सवाची तारीख जाहीर, म्हापशात कार्यक्रमांची रेलचेल; संपूर्ण माहिती जाणून घ्या..

Vasco: वास्कोत ‘सीसीटीव्ही’ बनले शोभेची वस्तू! गुन्ह्यांच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील नादुरुस्त कॅमेरे चर्चेत; कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित

Goa Live News: जागृत पर्यावरण प्रेमींसोबत; आमदार आरोलकर यांनी दिली ग्वाही

अग्रलेख: अनागोंदी कारभार पाहणाऱ्या, शिव्या ऐकणाऱ्या सामान्य गोंयकाराच्या तोंडी एकच प्रश्‍न आहे, ‘कुठे नेऊन ठेवणार गोवा?’

Goa Politics: 'जी गोष्ट भाजपची तीच विरोधकांची'! झेडपी निवडणूक निकालानंतरच्या राजकीय घडामोडी

SCROLL FOR NEXT