Rajasthan News: राजस्थानमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) 2019 ते 2021 या कालावधीत विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये एकूण 1015 जणांना अटक केली आहे. या संदर्भातील माहिती मंगळवारी विधानसभेत देण्यात आली.
संसदीय कामकाज मंत्री धारीवाल यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले की, 2019 ते 2021 पर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकूण 1015 जणांना अटक केली आहे. यापैकी 998 विरुद्ध खटला चालवण्यास मंजुरीचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आले होते, त्यापैकी 811 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे.
प्रश्नोत्तराच्या तासात या संदर्भात सदस्याने विचारलेल्या पुरवणी प्रश्नांना गृहमंत्र्यांच्या वतीने संसदीय कामकाज मंत्री उत्तरे देत होते. ते म्हणाले की, 59 प्रकरणांमध्ये खटला चालवण्यास मंजुरी देण्यात आलेली नाही आणि 128 प्रकरणे विचाराधीन आहेत, तर उर्वरित 17 प्रकरणांमध्ये संशोधन सुरु आहे.
तत्पूर्वी, आमदार अविनाश यांच्या मूळ प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात संसदीय कार्यमंत्र्यांनी सांगितले की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2019 ते 2021 या कालावधीत जैतरण विधानसभा मतदारसंघात लाच घेताना पकडलेल्या तीन कर्मचाऱ्यांवर (Employees) गुन्हे दाखल केले आहेत.
तसेच, राजस्थानमधील (Rajasthan) आणखी एका बातमीत, एका बँक कर्मचाऱ्याने पालीच्या औद्योगिक पोलीस स्टेशन परिसरातील हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचा आरोप आहे. स्टेशन अधिकारी हिंगलाज दान यांनी सांगितले की, डिडवाना येथील रहिवासी डोलसिंग (55) यांनी मंगळवारी हॉटेलच्या खोलीत गळफास लावून घेतला.
ते म्हणाले की, नातेवाइकांच्या प्राथमिक चौकशीत मृत व्यक्ती मानसिक तणावाखाली असावी, असे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, डोलसिंग हे लष्करातून निवृत्तीनंतर बँक ऑफ बडोदामध्ये एलडीसी पदावर कार्यरत होते. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.