Another Seema Haider Dainik Gomantak
देश

सीमा हैदरसारखी आणखी एक घटना, 24 वर्षीय विवाहित महिलेने ओलांडली 'सीमा'

Another Seema Haider: नोएडातील रबुपुरा येथे राहणारी पाकिस्तानी महिला सीमा हैदरने तिचा प्रियकर सचिन मीनासाठी सीमा ओलांडली.

Manish Jadhav

Another Seema Haider: नोएडातील रबुपुरा येथे राहणारी पाकिस्तानी महिला सीमा हैदरने तिचा प्रियकर सचिन मीनासाठी सीमा ओलांडली. सध्या ती येथे राहत असून तिला पाकिस्तानात परत न पाठवण्याची विनंती तिने सरकारकडे केली आहे.

मात्र, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. दरम्यान, सीमा हैदरसारखे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीमा हैदरप्रमाणेच एक महिला भारतीय तरुणाशी लग्न करण्यासाठी बेकायदेशीररित्या भारतीय हद्दीत आली आहे.

भेटीचे रुपांतर प्रेमात झाले

दरम्यान, ही महिला (Women) उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील धर्मनगर येथे अवैधरित्या आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मनगर उपविभागातील फुलबारी येथे राहणारा नूर जलाल हा अनेकदा बांगलादेशातील मौलवी बाजार येथे आयुर्वेद औषधांसाठी जात असे. यादरम्यान तो 24 वर्षीय विवाहित महिलेच्या संपर्कात आला, असे पोलिसांनी सांगितले.

एसडीपीओ (धर्मनगर) देबाशीष साहा यांनी पीटीआयला फोनवर सांगितले - “फातिमा नुसरत नावाची ही महिला नूरच्या प्रेमात पडली. यानंतर ती बेकायदेशीररित्या लग्न करण्यासाठी सुमारे 15 दिवसांपूर्वी धर्मनगरला पोहोचली.''

नूरला अटक करण्यात आली

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, फातिमा आणि नूर फुलबारी येथे राहत होते. गुरुवारी नूरला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, मात्र तो फरार झाला.

दरम्यान, पाकिस्तानच्या सीमा हैदरची कहाणीही अशीच सुरु झाली. सीमाने सचिनला भेटण्यासाठी सीमा ओलांडली. सध्या सचिन मीना आणि सीमा हैदर उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे वैवाहिक जीवन जगत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 17 September 2025: नोकरीत वरिष्ठांचा विश्वास मिळेल, कामाच्या ठिकाणी कौतुक होईल;प्रवासात यश

Pramod Sawant In Mumbai: "कामगारांचे कल्याण आणि सर्वांगीण विकासासाठी गोवा कटिबद्ध", 'OSH India 2025' मध्ये मुख्यमंत्री सावंतांचे प्रतिपादन

Goa Politics: "मंत्र्यांना सेवा नको, फक्त पैसा हवा...", मंत्री तवडकरांच्या नाराजीवरुन गिरीश चोडणकरांचा सरकारला टोला

Sam Konstas Century: कसोटी सामन्यात 'वनडे'चा तडका! बुमराहशी पंगा घेणाऱ्या पठ्ठ्यानं ठोकलं तूफानी शतक; भारतीय गोलंदाज हवालदिल

India vs Pakistan: लायकीवर उतरला पाकिस्तानी खेळाडू! सूर्यकुमार यादवला दिली शिवी; म्हणाला, "भारताला लाज वाटली पाहिजे" Watch Video

SCROLL FOR NEXT