Goods Train Accident in Odisha Dainik Gomantak
देश

Odisha Railway Accident : ओडिशात आणखी एक रेल्वे अपघात; बारगडमध्ये मालगाडीचे 5 डबे रुळावरून घसरले

Ashutosh Masgaunde

Wrestlers Protest: आता तोडगा निघणार? कुस्तीपटूंनी घेतली अमित शाहंची भेट; अनेक मुद्यावर झाला खलRailway Accidents in Odisha

ओडिशामध्ये आणखी एक रेल्वे अपघात झाला आहे. ओडिशाच्या बरगढमध्ये मालगाडीचा अपघात झाला आहे. मालगाडीचे 5 डबे रुळावरून घसरले आहेत.

ही मालगाडी चुनखडीने भरलेली होती आणि बारगढ येथे तिचे 5 डबे रुळावरून घसरले. मात्र, या अपघातात कोणातीही हानी झालेली नाही. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या अपघातावर ईस्ट कोस्ट रेल्वेचेही वक्तव्य आले आहे. ही मालगाडी खासगी सिमेंट कंपनी चालवत असल्याचे रेल्वेने सांगितले. ते नॅरोगेज साइडिंगवर चालत होते.

रोलिंग स्टॉक, इंजिन, वॅगन, ट्रेन ट्रॅक (नॅरो गेज) यासह सर्व पायाभूत सुविधांची देखभाल कंपनी स्वतः करत आहे.

ओडिशातील बालासोर येथे भीषण अपघात

याआधी शुक्रवारी ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात आतापर्यंत 275 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 1100 जण जखमी झाले आहेत. मृतांपैकी 187 मृतदेहांची ओळख पटलेली नाही.

अपघात कधी आणि कसा झाला?

ही घटना बालासोरच्या बहनगा बाजार स्टेशनजवळ घडली. येथे चेन्नईहून हावडाकडे जाणारी १२८४१ कोरोमंडल एक्सप्रेस लूप लाइनमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली.

यानंतर कोरोमंडलचे अनेक डबे रुळावरून घसरले. हे डबे जवळून जाणाऱ्या यशवंतपूर हावडा एक्स्प्रेसला धडकले.

मिळालेल्या माहितीनुसार मालगाडी बहनगा बाजार स्टेशनजवळ लूप लाइनमध्ये उभी होती. दरम्यान, चेन्नईहून हावडाकडे जाणारी १२८४१ कोरोमंडल एक्सप्रेस बहनगा बाजार स्थानकाजवळ पोहोचली.

कोरोमंडल एक्स्प्रेस मुख्य अप मार्गावरून भरधाव वेगाने जात होती. त्यानंतर ती मेन लाइनवरून लूप लाइनवर आली आणि तिथे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले आणि तिसऱ्या मार्गावरून जाणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसच्या डब्यांना धडकले.

या दोन्ही गाड्यांना बहनगा बाजार स्थानकावर थांबा नाही. त्यामुळे दोन्ही गाड्या वेगाने होत्या, अशा प्रकारे ट्रेनचे डबे एकमेकांवर चढले. या अपघातात 275 जणांचा मृत्यू झाला.

रेल्वेकडून सीबीआय चौकशीची मागणी

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी तळ ठोकून आहेत. त्यांनी सांगितले की आम्ही तिहेरी ट्रेन अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

मात्र, अपघाताच्या दिवशी त्यांनी इलेक्ट्रिक पॉइंट मशीन आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगला अपघाताचे कारण सांगितले. वैष्णव म्हणाले, पॉइंट मशीनची सेटिंग बदलली होती. हे कसे आणि का केले, हे तपास अहवालात समोर येईल.

वैष्णव म्हणाले, या भीषण घटनेचे मूळ कारण शोधण्यात आले आहे. मला तपशिलात जायचे नाही. अहवाल येऊ द्या. मी एवढेच म्हणेन की अपघाताचे खरे कारण आणि त्याला जबाबदार असणारे लोक शोधले गेले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT