Sirisha bandla
Sirisha bandla Dainik Gomantak
देश

कल्पना चावला नंतर अजून एक भारतीय महिला अंतराळात घेणार गगनभरारी!

दैनिक गोमन्तक

अमेरिकी अंतराळ कंपनी असलेल्या व्हर्जिन गॅलेक्टिकटचे (Virgin Galacticat) रिचर्ड ब्रेनसन (Richard Branson) आपल्याच सहकाऱ्यासंह काही कालावधीतच अंतराळ मोहिमेच्या (Space Mission) सफरीवर जाणार आहेत. या सहा सहकाऱ्यांमध्ये एक भारतीय वंशाच्या महिला शात्रज्ञही सहभागी आहेत. सिरिशा बांदला (Sirisha bandla) असं त्यांचं नाव आहे. संपूर्ण भारतीयांचं या अंतराळ मोहिमेकडे लक्ष लागलं आहे. येत्या 11 जुलै रोजी न्यू मेक्सिको (New Mexico) येथून अंतराळामध्ये उड्डाण होणार आहे. अंतराळ संशोधनाची जबाबदारी या सिरीशा संभाळणार आहेत. विशेष म्हणजे या अंतराळ मोहिमेमध्ये सहा जणांच्या पथाकामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

सिरिशा बांदला या अँरोनॉटिकल इंजिनिअर (Aeronautical Engineer) आहेत. पर्ड्यू या विश्वविद्यायमाधून पदवीपर्यंतचे शिक्षण सिरिशा यांनी पूर्ण केले आहे. कल्पना चावला यांच्यानंतर अंतराळामध्ये झेप घेणाऱ्या सिरिशा बांदला या दुसऱ्या भारतीय महिला ठरणार आहेत.

दरम्यान, आतापर्यंत चार भारतीयांनी अंतराळ सफर केली आहे. 'युनिटी 22 क्रू' आणि कंपनीचा एक भाग होणार असल्याच्या गोष्टीचा मला अभिमान आहे, असं ट्विट करत सिरिशा यांनी म्हटले आहे. सिरिसा बांदला यांचा जन्म आंध्रप्रदेशातील (Andhra Pradesh) गुटुंर जिल्ह्यामधील एका गावात झाला आहे. त्यांनी टेक्सासमधील ह्यूस्टन येथे शालेय शिक्षण पूर्ण केलं. सिरिशा यांचे आजोबा बांदला रगहिया एक नावाजलेले कृषी वैज्ञानिक आहेत. आणि त्यांनी आपल्या नातीच्या या कामगिरीचं तोंडभरुन कौतुक केले आहे. ''मी लहाणपणापासून तिच्यामधील उत्साह पाहत आलो आहे. अखेर ती तिनं पाहिलेले स्वप्न साध्य करण्यासाठी सज्ज झाली. मला पूर्ण विश्वास आहे ती या मिशनमध्ये पूर्णपणे यशस्वी होईल,'' असं सिरिशाच्या आजोबांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT