Another death threat to Mukesh Ambani, now demanding 400 crores Dainik Gomantak
देश

Mukesh Ambani: मुकेश अंबानींना धमकीचा तिसरा मेल; 400 कोटींची केली मागणी

Mukesh Ambani: ही सुविधा त्यांना देशात आणि देशाबाहेरही दिली जाते.

दैनिक गोमन्तक

Mukesh Ambani: उद्योग जगतात मुकेश अंबानी यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ते नेहमीच आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमुळे चर्चेत येत असतात. आता मात्र ते वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. मिळालेल्या माहीतीनुसार, मुकेश अंबानींना इ-मेलवरुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

महत्वाचे म्हणजे, अशी धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानीं( Mukesh Ambani )कडे २०० कोटी रुपयांची मागणी केली होती. पण आता मुकेश अंबानींना इ-मेलच्या माध्यमातून २०० कोटींऐवजी ४०० कोटी रुपए देण्याची मागणी केली आहे.

सुरुवातीला मुकेश अंबानींना २० कोटी रुपयांसाठी धमकी आली होती, त्यानंतर दोनदा २०० कोटी आणि ४०० कोटी रुपयांसाठी धमकी देण्यात आली आहे. त्यांना आता तिसऱ्यांदा धमकी दिली आहे.

महत्वाचे म्हणजे, धमकी देणाऱ्याने असेही लिहले आहे की, तुमची सुरक्षा व्यवस्था किती चांगली असली तरीही पोलिस( Police ) मला ट्रॅक करु शकत नाहीत. मला जर हे पैसे मिळाले नाहीत तर तुम्हाला गोळी मारण्यात येईल.

पहिल्यांदा जेव्हा हा इ-मेल मुकेश अंबानीना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 387, 506 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आता हा इ-मेल कोणी गंमत म्हणून केला आहे की यात काही तथ्य आहे याचा तपास सुरु केला आहे.

या प्रकरणाचा लवकरच उलगडा करण्यात येईल. याला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे. मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना झेड प्लस सुरक्षा मिळाली आहे. ही सुविधा त्यांना देशात आणि देशाबाहेरही दिली जाते. मात्र, हा खर्च त्यांना स्वत: उचलावा लागतो. आता मुकेश अंबानींना कोणी धमकी दिली हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT