Angry over free bus travel for women, driver burns own autorickshaw in Telangana, watch thrilling video:
तेलंगणात महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेला ऑटोरिक्षा चालकांचा तीव्र विरोध होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, योजनेला विरोध करत एका ऑटोरिक्षा चालकाने हैदराबादमधील प्रजा भवनाजवळ स्वतःची रिक्षा पेटवून दिली.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येतेय की, त्या व्यक्तीने आपल्या ऑटोला आग लावून आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याला तसे करण्यापासून रोखले.
ऑटोरिक्षा पेटवणाऱ्या चालकाचे नाव देवा असे आहे. देवाने आपल्या ऑटोरिक्षासह गजबजलेल्या बेगमपेट भागातील प्रजा भवन गाठले आणि वाहन पेटवून दिले. देवाने आत्मदहनाचाही प्रयत्न केला, पण सतर्क पोलिसांनी त्यांना रोखले.
आगीत ऑटोरिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली. पोलिसांनी महबूबनगर येथील ४५ वर्षीय देवाला ताब्यात घेतले आहे.
राज्याच्या विविध भागातील ऑटोरिक्षा चालक सरकारच्या 'महालक्ष्मी' योजनेला विरोध करत आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना राज्यभरात तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ (TSRTC) बसमधून मोफत प्रवास करता येत आहे. यामुळे रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे रिक्षाचालक म्हणत आहेत.
सत्तेवर आल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार ही योजना सुरू केली.
रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने तेलंगणा विधानसभा निवडणुकीत चमकदार कामगिरी केली होती आणि बहुमत मिळवले होते आणि बीआरएस नेते के. चंद्रशेखर राव यांची सत्ता उलथावली होती.
या योजनेमुळे त्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचे ऑटोरिक्षा चालकांचे म्हणणे आहे. नुकसान भरून काढण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी त्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये निदर्शने केली आहेत.
पूर्वी प्रगती भवन म्हणून ओळखले जाणारे प्रजा भवन, BRS सरकारच्या वेळी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान होते.
हे आता उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्का यांचे अधिकृत निवासस्थान आहे आणि आठवड्यातून दोनदा सार्वजनिक तक्रारी आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते याचा वापर करत असतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.