Andhra Train accident  Dainik Gomantak
देश

Andhra Train Derailed: आंध्र प्रदेशात दोन रेल्वेंची टक्कर; पॅसेंजर ट्रेनचे 3 डबे रूळावरून घसरले...

Akshay Nirmale

Andhra Pradesh Train Derailed: आंध्र प्रदेशातील विजयनगरम येथे एका पॅसेंजर ट्रेनची दुसऱ्या ट्रेनला धडक बसली. या अपघातामुळे रेल्वेच्या 3 बोगी रुळावरून घसरल्या. आतापर्यंत 10 जण जखमी झाल्याची बातमी समोर येत आहे.

आंध्र प्रदेश ट्रेन रुळावरून घसरली विझियानगरमजवळ पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली आंध्र प्रदेश ट्रेन रुळावरून घसरली: आंध्र प्रदेशमध्ये दोन गाड्यांची टक्कर, पॅसेंजर ट्रेनच्या 3 बोग्या रुळावरून घसरल्या, मदतकार्य सुरू

आंध्र प्रदेशातील विजयनगरमजवळ हा अफघात घडला आहे. एक पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विजयनगरम जिल्ह्यात प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन दुसऱ्या पॅसेंजर ट्रेनला धडकली आणि 3 डबे रुळावरून घसरले.

विशाखापट्टणमहून रायगडाकडे ही रेल्वे जात होती. रेल्वेचे डबे कोठावलसा (एम) अलमंडा-कंटकपल्ली येथे रुळावरून घसरले. या अपघातात 10 प्रवासी जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोहोचलेले अधिकारी मदतकार्यात व्यस्त आहेत.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी तात्काळ मदतीचे आदेश दिले आहेत. विशाखापट्टणम आणि अनकापल्ले या जिल्ह्यांतून शक्य तिथक्या रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

जखमींवर चांगल्या उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची व्यवस्था करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य, पोलीस आणि महसूलसह इतर सरकारी विभागांना जखमींना तातडीने वैद्यकीय मदत देण्याचे आदेश दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT