Hindu Temple
Hindu Temple  Dainik Gomantak
देश

Andhra Pradesh: हिंदू धर्माचे संरक्षण आणि प्रचारासाठी दक्षिणेतील 'या' राज्याचा मोठा निर्णय, बांधणार तब्बल 3000 मंदिरे

Pramod Yadav

आंध्र प्रदेश सरकार राज्यातील प्रत्येक गावात मंदिर बांधणार आहे. प्रत्येक गावात एक मंदिर असावे, हे ध्यानात घेऊन राज्यात मोठ्या प्रमाणावर मंदिरे उभारणी सुरू असल्याचे सरकारने म्हटले आहे. (Andhra Pradesh To Build 3,000 Temples To "Protect Hindu faith)

उपमुख्यमंत्री कोट्टू सत्यनारायण यांनी सांगितले की, मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम हिंदू धर्माचे संरक्षण आणि प्रचार करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे.

"हिंदू धर्माचे मोठ्या प्रमाणावर संरक्षण आणि प्रचार करण्यासाठी दुर्बल घटकांच्या भागात हिंदू मंदिरांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे," असे एंडोमेंट्स मंत्री सत्यनारायण यांनी मंगळवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले. तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या श्री वाणी ट्रस्टने मंदिरांच्या बांधकामासाठी प्रत्येकी 10 लाख रुपये दिले आहेत.

1,330 मंदिरांचे बांधकाम सुरू झाल्यानंतर, आणखी 1,465 मंदिरे जोडले गेले आहेत. तसेच काही आमदारांच्या विनंतीवरून आणखी 200 मंदिरे बांधली जाणार आहेत. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणाले की उर्वरित मंदिरे इतर स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने बांधली जातील.

उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, एंडोमेंट विभागांतर्गत 978 मंदिरांचे बांधकाम वेगाने सुरू आहे, तर प्रत्येक 25 मंदिरांचे काम एका सहाय्यक अभियंत्याकडे सोपविण्यात आले आहे.

ते म्हणाले की काही मंदिरांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि मंदिरांमध्ये धार्मिक विधी करण्यासाठी वाटप केलेल्या 270 कोटी रुपयांच्या CGF निधीपैकी 238 कोटी रुपये आधीच जारी करण्यात आले आहेत.

उपमुख्यमंत्री कोट्टू सत्यनारायण म्हणाले की, मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसी सरकारने राज्यभरातील मंदिरांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. ते म्हणाले की, एंडोमेंट्स विभाग प्रत्येक मंदिरासाठी 10 लाख रुपये देऊन 3,000 मंदिरे विकसित आणि नूतनीकरण करण्याचा विचार करत आहे.

जगन मोहन सरकारने यापूर्वीच 26 जिल्ह्यांमध्ये 1400 मंदिरे बांधण्याची घोषणा केली आहे. त्यापैकी 1030 बांधकामे सरकार स्वत: तर 330 समरसथ सेवा फाऊंडेशन बांधत आहेत.

विशेष म्हणजे हे फाउंडेशन आरएसएसशी संलग्न एनजीओ आहे. प्रत्येक मंदिरासाठी 8-8 लाख आणि मूर्तीसाठी 2-2 लाख रुपयांची तरतूद आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mormugao Port: बिर्लाचा गोव्याला रामराम, महाराष्ट्रात हलविले कामकाज; आमदार संकल्प आमोणकरांवर गंभीर आरोप

PM Modi In Goa: पीएम मोदी 150 कोटी घेऊन येणार? सभेपूर्वी पंतप्रधानावर गोवा काँग्रेसकडून प्रश्नांचा भडीमार

Amthane Dam Water : ‘आमठाणे’त अखेर पाणी; जलस्रोत खात्याकडून उपाययोजना

Lok Sabha Election 2024: तेलंगणाचे CM रेवंत रेड्डी यांची जीभ घसरली; PM मोदींना म्हणाले 'काळा साप'

Goa Weather And Heatwave Update: अवकाळीनंतर पारा घटला; गोव्यात कसे राहणार हवामान? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT