TDP party mla koneti adimulam  Dainik Gomantak
देश

TDP आमदाराची अश्लिल क्लिप व्हायरल; व्हिडिओ मॉर्फ करुन बदनामीचा कट रचल्याचा आरोप

TDP MLA Video: आंध्र प्रदेशातील सत्ताधारी टीडीपी पक्षाच्या एका आमदाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.

Manish Jadhav

TDP MLA Video: आंध्र प्रदेशातील सत्ताधारी टीडीपी पक्षाच्या एका आमदाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. टीडीपी आमदाराचा व्हिडिओ व्हायरल होताच राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला सुरुवात झाली. आंध्र प्रदेशातील एका महिलेने तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) आमदार कोनेटी आदिमुलम यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला. या आरोपांबाबत एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, पुरुष आणि महिला यांच्यातील लैंगिक कृत्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कुठे आणि केव्हा शूट करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. एवढचं नाहीतर या व्हिडिओमध्ये आदिमुलम आहेत की नाही याचीही पुष्टी करता येत नाहीये.

व्हिडिओ समोर आल्यानंतर आमदार कोनेटी आदिमुलम यांनी आरोप फेटाळून लावले आणि आपल्याच पक्षाच्या नेत्यांनी आपल्या विरोधात कट रचल्याचा आरोप केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदिमुलम यांनी हा व्हिडिओ खोटा आणि कथितरित्या छेडछाड करण्यात आल्याचे म्हटले. या महिलेशी आपले कोणतेही संबंध नसल्याचेही त्यांनी पुढे सांगितले. दरम्यान, एका सोशल मीडिया पोस्टमध्ये आमदार महोदय तिला 'बहीण' म्हणत असत असा उल्लेख केला जात आहे.

संबंधित महिला सत्यवेदू येथील TDP महिला विंगची प्रमुख आहे. कोनेटी आदिमुलम यांचा सत्यवेदू विधानसभा मतदारसंघ आहे. कोनेटी याआधी वायएसआर काँग्रेस पक्षात होते, परंतु 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी टीडीपी पक्षात प्रवेश केला. टीडीपीत प्रवेश केल्यानंतर त्यांना लगेच विधानसभा निवडणुकीत तिकीटही देण्यात आले. दरम्यान, या वृत्तानंतर अद्याप तेलगू देसम पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. तसेच, व्हिडिओच्या सत्यतेचीही पुष्टी झालेली नाहीये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT