Gas leak Dainik Gomantak
देश

Andhra Pradesh: औद्योगिक परिसरात गॅस गळती, 68 लोकं रुग्णालयात दाखल

गॅस गळतीमुळे काही महिला आजारी पडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले

दैनिक गोमन्तक

विशाखापट्टणम: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमजवळील औद्योगिक परिसरात गॅस गळतीमुळे 68 लोक आजारी पडल्याची माहिती आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गॅस गळतीची (Gas leak) ही घटना आंध्र प्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यात घडली. अच्युतापुरम येथील एका कंपनीत गॅस गळती झाल्याची माहिती समोर आली आहे. (Gas leak Accident)

काही महिला आजारी पडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गॅस गळतीनंतर, कामगारांनी घाबरून उलट्या झाल्याची तक्रार केली. यानंतर, त्यांना विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) वैद्यकीय केंद्रात प्रथमोपचार सुविधा प्रदान करण्यात आली आणि नंतर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अनकापल्ले चे एसपी म्हणाले, "ब्रॅंडिक्सच्या परिसरात गॅस गळती झाल्याची माहिती समोर आली आहे. 68 जणांना रुग्णालयात हलवण्यात आले असून परिसर रिकामा करण्याचे काम सुरू आहे.जिल्ह्यात 3 जून रोजी अशीच घटना घडली होती. आतापर्यंत 68 जणांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

200 महिलांनी डोळे जळणे, अस्वस्थता आणि उलट्या होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या भागातील पॅरस लॅबोरेटरीज युनिटमध्ये अमोनिया गॅसची गळती झाल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या तज्ज्ञांच्या टीमने कोकरूला भेट दिली आणि गळती शोधण्यासाठी चाचण्या घेतल्या. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने लॅब बंद करण्याचे आदेश दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

SCROLL FOR NEXT