Vivekananda Reddy Murder Case: आंध्र प्रदेशचे माजी मंत्री वायएस विवेकानंद रेड्डी हत्या प्रकरणात एक मोठी बाब समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयचा 'सिक्रेट विटनेस' समोर आला आहे.
ही विटनेस दुसरी कोणी नसून मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांची धाकटी बहीण वायएस शर्मिला आहेत. ज्या YSR तेलंगणा पक्षाच्या संस्थापक देखील आहेत. दरम्यान, शर्मिला यांचे वक्तव्य असलेले सीबीआयचे अंतिम आरोपपत्र शुक्रवारी समोर आले आहे.
शर्मिला यांनी दिलेल्या वक्तव्यावरुन त्या सीबीआयच्या तपासकर्त्यांसमोर हजर झाल्याचे दिसून येते. त्यात त्यांनी काका विवेकानंद यांच्या हत्येचा आणि त्यांच्या राजकीय पावलांचा संबंध असल्याचे म्हटले आहे.
खरे तर, 5 मार्च 2019 रोजी विवेकानंद रेड्डी यांची निवडणूक प्रचारादरम्यान हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास करणार्या सीबीआयने (CBI) अलीकडेच सांगितले होते की, त्यांनी आपल्या सिद्धांताची पुष्टी करण्यासाठी एका प्रमुख विटनेसला मनवले केले आहे.
केंद्रीय एजन्सीने या प्रकरणी अंतिम आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये अविनाश आणि त्यांचे वडील भास्कर रेड्डी या दोघांवर हत्येची योजना आणि चार हल्लेखोरांना सुपारी दिल्याचा आरोप होता.
शर्मिला यांनी सीबीआय अधिकार्यांना सांगितले की, विवेकानंदांनी भास्कर, त्यांचे बंधू मनोहर रेड्डी आणि अविनाश यांना 2017 मध्ये झालेल्या आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) विधानपरिषद निवडणुकीत पराभवासाठी जबाबदार धरले होते.
सीबीआयने दावा केला की, विवेकानंदांनी जगन यांना सांगितले होते की, कडप्पा जागेसाठी वायएसआरसीपीचे तिकीट जगनची आई वायएस विजयम्मा किंवा शर्मिला यांना दिले पाहिजे.
शर्मिला यांनी आपल्या वक्तव्याची पुष्टी करताना सांगितले की, विवेकानंद त्यांच्या हत्येच्या दोन महिन्यांपूर्वी माझ्याकडे आले होते. यावेळी त्यांनी अविनाश आणि त्यांच्या कुटुंबाला निवडणूक लढ्यापासून दूर ठेवण्याच्या त्यांच्या प्रस्तावास सहमती दर्शवली होती. मात्र जगन मला तिकीट देणार याची खात्री नसतानाही मी त्यावेळी त्यांच्या प्रस्तावाला होकार दिला होता.
दुसरीकडे, विवेकानंद यांनी 2011 ची पोटनिवडणूक पुलिवेंदुला विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर लढवली होती. वायएसआरसीपीने वायएस विजयम्मा यांना उमेदवारी दिली, ज्यांनी जागा जिंकली.
नंतर 2014 च्या निवडणुकीत, अविनाशची YSRCP कडून कडपाह खासदार उमेदवार म्हणून निवड झाली. शर्मिला दावा करतात की, विवेकानंदांना वाटले होते की, जगन त्यांना 2019 च्या निवडणुकीत सिट देणार नाही आणि त्यांनी विजयम्मा किंवा शर्मिला यापैकी एकाला पर्याय म्हणून पाहिले. या हत्येमागे हा डावपेच असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, त्यांचे कुटुंब आणि अविनाशच्या कुटुंबात एक प्रकारचे शीतयुद्ध सुरु असल्याचेही शर्मिला यांनी सीबीआय अधिकाऱ्यांना सांगितले. जगन यांची पत्नी भारती या भास्कर यांच्या बहिणीची मुलगी आहेत.
शर्मिला लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्या तरी विवेकानंदांना विश्वास होता की, अविनाशला कडपाहमधून मैदानात उतरवण्याविरुद्ध जगन यांना मनवतील, ज्यामुळे त्यांची हत्या झाली असावी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.