Puri Shankaracharya File Photo
देश

Shankaracharya: येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर यांचे पूर्वज सनातनी हिंदूच - शंकराचार्य स्वामी निश्चलानंद

पुरीच्या मंदिरातील चार तिजोरीच्या चाव्या सुमारे 38 वर्षांपूर्वी हरवल्या होत्या - स्वामी निश्चलानंद

गोमन्तक डिजिटल टीम

मोहम्मद पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांचे पूर्वज सनातनी हिंदू (Hindu) होते असा दावा शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी केला आहे. मोहम्मद पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांचे पूर्वज सनातनी हिंदू होते. हा मुद्दा अमेरिकेतल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्या संसदेत उपस्थित केला होता.

स्वामी निश्चलानंद यांनी भुवनेश्वर येथे 31 जानेवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात हे वक्तव्य केलं आहे. पुरीच्या मंदिरात एकूण सात भांडार आहेत, त्यापैकी एक नेहमी खुला असतो. सुमारे 38 वर्षांपूर्वी चार तिजोरीच्या चाव्या हरवल्या होत्या. असेही स्वामी निश्चलानंद ( Puri Swami Shankaracharya) म्हणाले.

उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये (Joshimth) येथे मागील काही दिवसांपूर्वी घर, इमारती आणि रस्त्यांना भेगा पडल्या होत्या. याबाबत बोलताना स्वामी निश्चलानंद म्हणाले की, "पृथ्वी आणि पर्यावरण शुद्ध ठेवणे आपल्या सर्वांचे काम आहे. 'विकास' हा शब्द योग्य संदर्भात समजून घेतला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी विकास करण्याची गरज नाही. पृथ्वी, पाणी आणि हवा हे उर्जेचे स्रोत आहेत."

"सरकारचे मंदिर आणि मठावर नियंत्रण असू नये, आणि प्रत्येक ठिकाणी केवळ विकासासाठी पैसा खर्च करणे आवश्यक आहे," असे निश्चलानंद म्हणाले.

पुरीच्या रत्न भांडारच्या हरवलेल्या किल्लीबद्दल देखील शंकराचार्य यांना विचारण्यात आले. "ओडिशा सरकार आणि जगन्नाथ मंदिर प्रशासनाने मंदिरासंबंधी कोणत्याही मुद्द्यांवर कधीही चर्चा केली नाही. रत्न भंडारच्या हरवलेल्या चावीच्या मुद्द्यात मी हस्तक्षेप का करू? असे स्पष्टीकरण शंकराचार्य यांनी यावेळी दिले.

सुमारे 38 वर्षांपूर्वी चार भंडारांच्या चाव्या अचानक गायब झाल्या. जिल्हाधिकाऱ्यांकडे फक्त दोन भंडारांची चावी होती. असेही शंकराचार्य म्हणाले.

दरम्यान, शंकराचार्य यांच्या या वक्तव्यानंतर आता सोशल मिडियावर चर्चा सुरू झाली असून, लोकांच्या विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: कर्नाटक राज्यातून आणलेले अंदाजे 420 किलो गोमास जप्त

Tragic Death: चिमुकलीने गिळला जिवंत मासा, बस्तोड्यातील दुर्दैवी घटना; 6 वर्षाच्या बाळाचा मृत्यू

Mohammed Siraj: सिराज 5 विकेट घेणार, माजी गोलंदाजांचे बोलणे ठरले खरे; ट्विट होतेय Viral

Rashi Bhavishya 05 August 2025: घरात मंगल कार्याची चर्चा, बँक व्यवहारात फायदा; संयमाने व्यवहार करा

Goa Cabinet Reshuffle: मंत्रिमंडळ फेरबदल कधी? दामू नाईकांनी टाळले उत्तर, म्हणाले मुख्यमंत्र्यांनी..

SCROLL FOR NEXT