Andhra Pradesh Dainik Gomantak
देश

जिल्ह्याच्या नामांतरावरुन संतप्त झालेल्या जमावाने मंत्र्यांच्या घराला लावली आग

आंध्र प्रदेशमध्ये जिल्ह्याच्या नामांतरावरुन संतप्त झालेल्या जमावाने मंत्र्यांच्या घराला आग लावली आहे.

दैनिक गोमन्तक

आंध्र प्रदेशातील अमलापुरम शहरात मंगळवारी दुपारी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर हिंसाचार उसळला. तिथे नव्याने निर्माण झालेल्या कोनसीमा जिल्ह्याचे नाव बदलून बीआर आंबेडकर कोनसीमा जिल्ह्याच्या प्रस्तावाला आंदोलक विरोध करत होते. या हिंसाचारात परिवहन मंत्री पिनिपे विश्वरुपू यांचे घर जाळण्यात आले. पोलिसांनी मंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुखरुप बाहेर काढले.

दरम्यान, आंदोलकांनी पोलिसांचे वाहन आणि एका शैक्षणिक संस्थेची बसही जाळली. त्याचबरोबर आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत अनेक पोलीस (Police) कर्मचारी जखमीही झाले. या घटनेत 20 हून अधिक पोलीस जखमी झाले असल्याचे सांगण्यत येत आहे. आम्ही या घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करु, असे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

तसेच, 4 एप्रिल रोजी तत्कालीन पूर्व गोदावरीतून कोनसीमा जिल्हा तयार करण्यात आला. गेल्या आठवड्यात, राज्य सरकारने कोनसीमाचे नाव बदलून बीआर आंबेडकर कोनसीमा जिल्ह्याचा प्रस्ताव ठेवणारी प्राथमिक अधिसूचना जारी केली होती. यावर काही आक्षेप असल्याने सरकारने (Government) नागरिकांना (Citizens) आमंत्रित केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abhishek Sharma Record: 69 षटकार... अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी! सूर्यकुमार यादवचा 4 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

EPFO Advance New Rules: आजारपण, लग्न, शिक्षण अन् घरासाठी PF काढण्याचे नियम बदलले; किती वेळा आणि किती पैसे काढता येणार?

October Temperature: गोव्यात ऑक्टोबरमध्ये उष्णतेचा विक्रम! पणजीत पारा 37.4 अंशांवर, म्हापशात 39.6 अंशांची नोंद

Horoscope: नवरात्रीचा पाचवा दिवस ठरणार भाग्याचा! 5 राशींचे नशीब चमकणार; प्रगतीचे संकेत, आर्थिक लाभाची शक्यता; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Tourist Death: कळंगुटमध्ये उघड्या लोखंडी सळ्यांनी घेतला पर्यटकाचा जीव; बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT