Ammonia Gas Leak in Chennai’s Ennore Dainik Gomantak
देश

Ammonia Gas Leak in Chennai’s Ennore: चेन्नईतील खत कंपनीतून अमोनिया गॅसची गळती, अनेकजण रुग्णालयात दाखल!

Ammonia Gas Leak in Chennai’s Ennore: तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील एन्नोरमध्ये मंगळवारी (26 डिसेंबर 2023) रात्री खळबळ उडाली.

Manish Jadhav

Ammonia Gas Leak in Chennai’s Ennore: तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील एन्नोरमध्ये मंगळवारी (26 डिसेंबर 2023) रात्री खळबळ उडाली, जेव्हा संपूर्ण परिसरातून एक विचित्र वास येऊ लागला आणि त्या वासामुळे अनेक लोक बेशुद्ध पडले. काही वेळाने कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या फर्टिलायजर कंपनीतून अमोनिया वायूची गळती झाल्याचे उघड झाले.

अनेक लोकांना रुग्णालयात दाखल केले

दरम्यान, या गॅस गळतीचा खत संयंत्राजवळील पेरियाकुप्पम सारख्या भागात राहणाऱ्या लोकांवर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. या भागातील लोकांना श्वास घेण्यास त्रास होतोय, मळमळ होतेय आणि ते बेशुद्ध देखील पडले. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 25 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तामिळनाडूच्या पर्यावरण आणि वन विभागाने सांगितले की, एन्नोर येथील प्लांटमधून उप-समुद्री पाईपमधून हा वायू बाहेर पडला. मात्र, हे कळताच तो थांबवण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि आरोग्य पथकासह परिस्थिती नियंत्रणात आणली. कंपनीचे प्रोडक्शन हेड म्हणाले की, पाईपमधून गॅस गळती होताच खूप तीव्र वास येऊ लागला.

कंपनीचे अध्यक्ष काय म्हणाले?

या गॅस गळतीबाबत, कंपनीचे अध्यक्ष अमीर अल्वी म्हणाले की, 26 डिसेंबर 2023 च्या रात्री 11.30 वाजता नियमित ऑपरेशन दरम्यान, कंपनीच्या उप-समुद्री पाइपलाइनमधून गॅस गळती होताना दिसला. मात्र, कंपनीच्या पथकाने सतर्कता दाखवत तात्काळ अमोनिया गॅसची पाइप वेगळी करुन बंद केली. पथकाने कमीत कमी वेळेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या सर्व प्रकारादरम्यान गॅस आजूबाजूच्या भागात पोहोचल्याने लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT