Amit Shah & Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
देश

Amit Shah: अमित शाहंची मोठी भविष्यवाणी, पीएम मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार...!

Modi Sarkar In 2024: गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या विजयाचे भाकीत केले आहे.

Manish Jadhav

Modi Sarkar In 2024: गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या विजयाचे भाकीत केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येईल, असा दावा अमित शाह यांनी केला. जागांचा अंदाजही त्यांनी वर्तवला. पीएम मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, आसाममधील (Assam) दिब्रुगड येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षावरही निशाणा साधला. लवकरच ते संपूर्ण देशातून पुसले जातील, असे ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्र्यांनी आसाम राज्यातील दिब्रुगड येथे भाजपच्या प्रदेश कार्यालयाची पायाभरणी केली.

शाह म्हणाले की, “मी काँग्रेसला (Congress) सांगू इच्छितो की 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आसाममध्ये 14 पैकी 12 जागा जिंकेल. आणि मोदीजी 300 पेक्षा जास्त जागांसह पूर्ण बहुमत मिळवून तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील.''

हिमंता सरकारची कामगिरी

शाह यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील आसाम सरकारच्या यशावर प्रकाश टाकला आणि हिमंता बिस्वा सरमा यांनी मे 2021 मध्ये मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यापासून गेल्या दोन वर्षात सुरु केलेल्या योजना आणि धोरणांबद्दल सांगितले.

ते म्हणाले की, “2016 मध्ये ईशान्येत भाजपची विजय यात्रा सुरु केल्याबद्दल मी आसामच्या जनतेचे आभार मानू इच्छितो. आता या प्रदेशातील सर्व राज्यांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि मित्रपक्षांची सत्ता आहे. आणि काँग्रेस, जो काही वर्षांपूर्वी ईशान्येतील सर्वात मोठा पक्ष होता, तो आता पूर्णपणे नाहीसा झाला आहे."

ईशान्येत भाजपची छाप कायम आहे

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप त्रिपुरामध्ये सलग दुसऱ्यांदा सत्तेत कसा परतला याची आठवण शहा यांनी सांगितली. नागालँड आणि मेघालयात मित्रपक्षांसह सरकारे स्थापन केली.

शाह यांनी प्रश्न केला की, “राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा निघाली, पण ईशान्येकडील तीन राज्यांत काँग्रेसचा सफाया झाला. पण ते बदलणार नाही. राहुल परदेशात जाऊन देशाची बदनामी करतात. हे वर्तन कोणत्याही देशभक्त नागरिकाकडून अपेक्षित आहे का?'

विशेष म्हणजे, अमित शाह दोन दिवसांच्या ईशान्येच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्यांनी अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्यातील किबिथूला भेट दिली आणि व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाचा शुभारंभ केला. व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम हा आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेल्या गावांचा विकास करण्याची योजना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

SCROLL FOR NEXT