Amit Shah  Dainik Gomantak
देश

मलाही अटक करण्यात आली होती - अमित शाह

गृहमंत्री अमित शाह यांनी एएनआयशी बोलताना दिली प्रतिक्रिया

दैनिक गोमन्तक

गुजरातमध्ये 2002 साली दंगली झाल्या होत्या. या प्रकरणावर सुनावनी घेतली. यात सर्वाच्च न्यायालयाने तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि इतरांना दिलेल्या क्लिनचीटला आव्हान देण्यात आले होते. ही आव्हान याचिका माजी काँग्रेस खासदार एहसान जाफरी यांच्या विधवा पत्नी झाकिया यांनी केली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आपले मत नोंदवले आहे. (Amit Shah reaction after Prime Minister modi got relief on gujarat riots )

याबाबत बोलताना शाह म्हणाले की, “19 वर्षानंतर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने जो निकाल दिला आहे. त्यानुसार पंतप्रधान मोदींवर असलेले सर्व आरोप नाकारले आहेत. हे आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत असेही कोर्टाने म्हटले आहे. यात पंतप्रधान मोदींची ही चौकशी झाली होती.

यावर बोलताना शाह म्हणाले की, त्यांनी आंदोलन केले नाही. देशभरातील कार्यकर्ते मोदींच्या समर्थनाथ उभे राहिले नाहीत. आम्ही कायद्याचे पालन केले. मलाही अटक करण्यात आली होती. पण एवढ्या मोठ्या लढाईनंतर सत्य जेव्हा समोर येते तेव्हा ते सोन्यापेक्षाही जास्त चमकते,” असे ते म्हणाले.

काय आहे गुजरात दंगल प्रकरण ?

27 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरातमधील गोध्रा येथे अयोध्येहून परतणाऱ्या सेवकांना घेऊन जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसचा डबा जळून 58 जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणावर दंगल उसळली आणि केंद्र सरकारला लष्कराच्या तुकड्या पाठवायला भाग पडले होते. यात झालेली जीवितहानी आणि वित्तहानी यामूळे ह्या प्रकरणाने देशात सर्वत्र हळहळ व्यक्त केले गेली होती. तसेच ही दंगल जाणिवपुर्वक घडवल्याचा दावा ही करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT