Tourist Leader.jpg
Tourist Leader.jpg 
देश

'देशात एक पर्यटक नेता आहे' म्हणत अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा

दैनिक गोमंतक

कोरोना महामारीच्या या गंभीर परिस्थितीमध्ये देखील पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचे जोरदार वारे वाहता आहेत. पश्चिम बंगालमध्ये सुरु असणाऱ्या या  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्याचे पाहायला मिळते आहे. 'देशात काही पर्यटक नेते सुद्धा आहेत' असे म्हणत अमित शाह यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.( Amit Shah criticizes Rahul Gandhi for being a tourist leader in the country)

राज्यात विधानसभा निवडणुकांचे चार टप्पे पार पडले असून सध्या पाचव्या टप्प्यासाठी प्रचार सुरु आहे. कोरोना संक्रमणामुळे निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीमध्ये देखील प्रचार सभा आणि रॅली मध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील सध्या पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळताना दिसता आहेत. त्यातच आज अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या तेहत्ता येथे प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी अमित शाह यांनी मतदानाचे अनेक टप्पे पार पडले परंतु राहुल बाबा कुठे  दिसले नाही." असे म्हणत राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. पुढे ते असेही म्हणाले की, "राहुल गांधी यांनी एकच प्रचार सभा घेतली आणि त्यांनी आमच्या डीएनए बद्दल प्रश्न उपस्थित केला. राहुल गांधी यांनी आमच्या डीएनए बद्दल विचारू नये आमचा डीएनए विकास, राष्ट्रवाद आणि आत्मनिर्भरतेचा आहे" असे म्हणत अमित शाह (Amit shah) यांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) निशाणा साधला आहे. 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) सध्या विधानसभा निवडणूक (Assembly Elections) सुरु असून, राज्यातील 294 विधानसभेच्या जागांवर एकूण 8 टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. या निवडणुकांचे 4 टप्पे आतापर्यन्त पार पडले असून चार टप्प्यांचे मतदान अजून बाकी आहे. या सर्व टप्प्यांतील मतदान पार पडल्यानंतर 2 मी रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT