Amit shah criticize on Rahul Gandhi  Dainik Gomantak
देश

'राहुल बाबा डोळे उघडा, इटालियन काढून भारतीय चष्मा घाला': शहांनी उडवली खिल्ली

अरुणाचल दौऱ्यावर गेलेले गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला.

दैनिक गोमन्तक

अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर असलेले गृहमंत्री अमित शहा यांनी एका कार्यक्रमात काँग्रेसवर हल्लाबोल केला. 'काँग्रेसचे लोक आंधळे होऊन विकास शोधत आहेत. राहुल बाबा, डोळे उघडा... इटालियन चष्मा काढा आणि भारतीय चष्मा घाला, मग तुम्हाला कळेल या 8 वर्षांत काय झाले आहे." असे राहुल गांधींची खिल्ली उडवत शहा म्हणाले.

अमित शहा इथेच थांबले नाहीत, तर काँग्रेसवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, काँग्रेसने यापूर्वी ईशान्येत अनेक लढाया केल्या होत्या. संपूर्ण ईशान्येमध्ये 2019 ते 2022 पर्यंत 9 हजार 600 अतिरेक्यांनी शस्त्रे टाकून सामान्य जीवन जगण्याचे काम केले आहे. आता काही दिवसांत दोन्ही राज्यांमधील सीमावादही संपुष्टात येणार आहे, असे शहा म्हणाले.

राज्यात रस्त्यांचे जाळे विणले

अमित शाह अरुणाचल प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, राज्यातील दूरवरच्या भागांना जोडण्यासोबतच आम्ही संपूर्ण राज्यात रस्त्यांचे जाळे विणले आहे. मी 2 दिवस राज्यात आहे आणि नमसाई जिल्ह्यातील लोकांशी संवाद साधत आहे, पण मला एक गोष्ट मान्य करावी लागेल की मी देशातील प्रत्येक ठिकाणी भेट दिली आहे परंतु संपूर्ण देशातील सर्वात सुंदर ठिकाण जर असेल तर, ते अरुणाचल प्रदेश आहे.

एवढेच नाही तर अरुणाचलचे लोक कुठेही भेटले तर लगेच जय हिंद म्हणत त्यांना शुभेच्छा देतात. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेली अभिवादनाची ही पद्धत या राज्याशिवाय देशात कुठेही नाही, असे म्हणत शहा यांनी राज्यातील लोकांचे कौतूक केले.

2 मोठ्या व्यावसायिक विद्यापीठांचा करार

राज्यातील विकासाबाबत बोलताना अमित शहा म्हणाले की, दोन मोठ्या व्यावसायिक विद्यापीठांमध्ये करार झाला आहे. त्यांनी सांगितले की मोदीजींनी संरक्षण क्षेत्राशी निगडीत 2 मोठी व्यावसायिक विद्यापीठे पुढे आणली आहेत. एक राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ आणि दुसरे राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ. नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटी हे संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाने सुसज्ज तंत्रज्ञ विकसित करणारे विद्यापीठ आहे. यासोबतच आपल्या लष्करी आणि निमलष्करी दलांना प्रशिक्षित मनुष्यबळ देण्यासाठी हे विद्यापीठ आहे, असे शहा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asim Munir: पाकचे सैन्य प्रमुख आसिम मुनीरने पुन्हा ओकली गरळ; भारताला दिली अणुयुद्धाची धमकी Watch Video

Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! एसी कोचमध्ये स्वच्छतेवर भर; प्रवाशांना मिळणार कव्हर घातलेले ब्लँकेट

चौकार-षटकारांचा पाऊस, 'पॉवर हिटर' किरण नवगिरेनं रचला इतिहास; टी-20 मध्ये झळकावलं सर्वात जलद शतक

Diwali Market: 200 वर्षांची परंपरा धोक्यात! 'भायले' व्यापारी आल्याने गोमंतकीय दुकानदारांचा व्यवसाय थंड

Cricket Players Death: क्रीडा विश्वात खळबळ! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू, बोर्डानं घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT