John Kirby Dainik Gomantak
देश

US: 'भारत एक जीवंत लोकशाही, दिल्लीत जा अन् ',PM मोदींच्या दौऱ्यापूर्वी अमेरिकनने केलं भारताचं कौतुक

या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत.

Puja Bonkile

India Democracy Is Much Better: अमेरिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील लोकशाहीच्या आरोग्याविषयीची चिंता फेटाळून लावली आहे. यूएस सरकारने सोमवारी (5 जून) सांगितले की भारत एक जीवंत लोकशाही आहे.

जो कोणीही नवी दिल्लीला भेट देतो तो स्वतः पाहू शकतो. व्हाईट हाऊसमधील राष्ट्रीय सुरक्षा परिषदेतील राजकीय संप्रेषणाचे समन्वयक जॉन किर्बी म्हणाले की, अमेरिकन प्रशासन लोकशाहीबद्दल चिंता व्यक्त करण्यास मागेपुढे पाहत नाही. 

जॉन किर्बी म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) या महिन्याच्या अखेरीस अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याचे स्वागत राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि जिल बायडन करणार आहेत. त्यादरम्यान 22 जून रोजी राजकीय डिनरचेही आयोजन करण्यात येणार आहे.

  • भारत आमचा खास मित्र - अमेरिका

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांनी जॉन किर्बीला स्टेट डिनरच्या निमंत्रणाचे कारण विचारले. यावर ते म्हणाले की, भारत हा अमेरिकेचा अनेक पातळ्यांवर मजबूत भागीदार आहे. 

शांग्री-ला सचिव (संरक्षण, लॉयड) ऑस्टिन यांनी आता काही अतिरिक्त संरक्षण सहकार्याची घोषणा केली आहे. ज्याचा आम्ही भारतासोबत पाठपुरावा करणार आहोत. आपल्या दोन्ही देशांत मोठा आर्थिक व्यापार आहे.

व्हाईट हाऊसमधील NSC समन्वयक जॉन किर्बी म्हणाले, भारत पॅसिफिक क्वाड सदस्य आहे आणि इंडो-पॅसिफिक सुरक्षेबाबत आमचा खास मित्र आणि भागीदार आहे. 

दोन्ही देशांमधील अनेक पातळ्यांवर भारत निश्चितच महत्त्वाचा आहे. जो बायडन यांना प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायला आवडेल, ज्यामुळे आमची मैत्री आणखी घट्ट होण्यास मदत होईल. ते पीएम मोदींच्या आगमनाची वाट पाहत आहेत.

एका पत्रकाराने जॉन किर्बी यांना भारतातील लोकशाहीबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले की भारत ही एक जीवंत लोकशाही आहे. भारताची स्थिती काय आहे हे तुम्ही तुमच्या परिचितांना विचारू शकता. लोकशाही संस्थांची ताकद आणि स्थिती या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी, अशी माझी अपेक्षा आहे. अशा मुद्द्यांवर बोलायला आम्ही कधीच कमी पडत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanpur Crime News: कारच्या छतावर बांधून दीड किमी फरफटत नेलं अन् नंतर चिरडलं... जुनी दुश्मनी ठरली जीवघेणी! कानपूरमध्ये तरुणाची निर्घुण हत्या VIDEO

Cricketer Suspension: न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यापूर्वी मोठा धक्का! स्टार खेळाडूवर निलंबनाची कारवाई; नेमकी काय चूक केली?

Congress Party: 'राहुल गांधींची सभा पार्किंगच्या जागेत, ही काँग्रेसची नामुष्की’; दिगंबर कामत यांचा टोला

Dawood Ibrahim: दाऊद इब्राहिम भारतात? UNच्या रिपोर्टवर भारताचा तीव्र आक्षेप, कडक शब्दात ताकीद देत केला थेट सवाल

North Goa Final Voter List: उत्तर गोव्याची अंतिम मतदारयादी 4 जानेवारीला; वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्याची संधी

SCROLL FOR NEXT