Amazon ad controversy Aryabhata Dainik Gomantak
देश

Amazon Insults Aryabhata: ॲमेझॉनच्या जाहिरातीवरून नवा वाद; 'आर्यभटांचा अवमान' केल्याचा आरोप करत सोशल मीडियावर नेटकरी आक्रमक

Amazon ad controversy Aryabhata: भारताच्या गौरवशाली इतिहासातील महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

Sameer Amunekar

भारताच्या गौरवशाली इतिहासातील महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. परंतु, हे चर्चेचे कारण त्यांच्या संशोधनाचे कौतुक नसून, ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'ॲमेझॉन'ची एक नवीन जाहिरात मोहीम आहे. ॲमेझॉनच्या 'ॲमेझॉन नाऊ' (Amazon Now) या सेवेसाठी तयार करण्यात आलेल्या जाहिरातीत आर्यभटांचा ज्या पद्धतीने वापर करण्यात आला आहे, त्यावर आता मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.

नेमका प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी अहमदाबादमधील आयपीएल (IPL) अंतिम सामन्यात एक व्यक्ती प्राचीन भारतीय वेशभूषेत, म्हणजेच गणितज्ञ आर्यभटांच्या अवतारात फिरताना दिसली होती. त्यानंतर मुंबई आणि बेंगळुरूमध्येही असाच 'आर्यभट लूक' असलेला व्यक्ती दिसून आला.

या अचानक दिसलेल्या व्यक्तिमत्त्वामुळे सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क आणि मीम्सचा पाऊस पडला. पुढे ॲमेझॉनने एक जाहिरात प्रदर्शित केली, ज्यामध्ये हे स्पष्ट झाले की, ही सर्व 'ॲमेझॉन नाऊ'च्या मार्केटिंग मोहिमेचा भाग होती. या जाहिरातीत आर्यभट आधुनिक भारतात 'शून्याचा' शोध घेताना दिसतात आणि शेवटी ॲमेझॉनवर उपलब्ध असलेल्या 'झिरो ॲडिशनल फी'च्या ऑफरशी जोडले जातात.

सोशल मीडियावर संतापाची लाट

ॲमेझॉनची ही कल्पना अनेकांना पचनी पडलेली नाही. 'Amazon Insults Aryabhata' हा हॅशटॅग सोशल मीडियावर वेगाने ट्रेंड होत आहे. युजर्सनी कंपनीवर थेट टीका करत म्हटले आहे की, ज्या महान व्यक्तीने जगाला 'शून्याची' देणगी दिली, त्यांना ॲमेझॉनने एका सामान्य जाहिरातीसाठी वापरून त्यांचा अपमान केला आहे.

"आर्यभट हे आमचे सांस्कृतिक प्रतीक आहेत, ते काही ब्रँड ॲम्बेसेडर नाहीत," अशा शब्दांत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी या जाहिरातीला भारताच्या बौद्धिक वारशाचा अवमान मानून ॲमेझॉनवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.

कंपनीची बाजू आणि जाहिरातीचे समर्थन

दुसरीकडे, जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञांनी आणि काही युजर्सनी या मोहिमेचे समर्थन केले आहे. त्यांच्या मते, ही जाहिरात आर्यभटांचा अपमान करत नाही, तर उलट त्यांच्या सर्वात मोठ्या योगदानाला, म्हणजेच 'शून्याला' आधुनिक काळाशी जोडून त्यांचा सन्मानच करत आहे. "ही जाहिरात आर्यभटांनी दिलेल्या शून्याच्या संकल्पनेला पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणते, यात चुकीचे काय?" असा सवाल काही नेटिझन्सनी उपस्थित केला आहे. जाहिरात तज्ज्ञांच्या मते, ही मोहीम अत्यंत कल्पक होती, कारण त्यांनी सुरुवातीला रहस्य निर्माण करून लोकांचे लक्ष वेधून घेतले होते.

वादाच्या भोवऱ्यात अडकलेली मार्केटिंग खेळी

अखेर, मार्केटिंगच्या शर्यतीत लोकांच्या भावनांचा विचार न केल्यामुळे ही मोहीम एका मोठ्या वादात अडकली आहे. एकीकडे ॲमेझॉनने आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही खेळी खेळली असली, तरी दुसरीकडे या ऐतिहासिक पात्राच्या वापरामुळे जनक्षोभाला सामोरे जावे लागत आहे. आता कंपनी यावर माफी मागते की ही मोहीम तशीच पुढे चालू ठेवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT