Money Laundering Case: आम आदमी पक्षाच्या आणखी एका बड्या नेत्याला ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. वक्फ मालमत्तेशी (Delhi Waqf Board Recruitment Scam) संबंधित एका प्रकरणात दिल्लीतील ओखला मतदारसंघातील पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांना अटक करण्यात आली आहे. सकाळी साडेअकरा वाजल्यापासून ईडी त्यांची चौकशी करत होती. काही दिवसांपूर्वी खान यांच्या घरावरही ईडीने छापेमारी केली होती. त्यावेळी ईडीने सांगितले होते की, छापेमारीदरम्यान अनेक महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यात आले होते, जे मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची भूमिका दर्शवते. त्याचवेळी, खोट्या केसेस दाखल करुन आपल्या नेत्याला फसवले जात असल्याचे आम आदमी पक्षाच्या वतीने सांगण्यात आले होते.
दरम्यान, 2 दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने अमानतुल्ला खान यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर अमानतुल्ला खान आज सकाळी ईडी कार्यालयात पोहोचले, जिथे ईडी 11.30 वाजल्यापासून त्यांची चौकशी करत होती. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन आणि संजय सिंह यांच्यानंतर अटक होणारे आम आदमी पक्षाचे अमानतुल्ला खान हे पाचवे बडे नेते आहेत. यापैकी फक्त संजय सिंह जामीन मिळाल्याने तुरुंगाबाहेर आहेत. अमानतुल्ला यांच्या विरोधातील मनी लाँड्रिंगची केस सीबीआय एफआयआर आणि दिल्ली पोलिसांच्या 3 तक्रारींशी संबंधित आहे.
वास्तविक, अमानतुल्ला खान यांच्यावर दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष असताना 32 जणांची बेकायदेशीरपणे भरती केल्याचा आरोप आहे. यासोबतच त्यांनी दिल्ली वक्फ बोर्डाच्या अनेक मालमत्ता बेकायदेशीरपणे भाड्याने दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. खान यांच्यावर दिल्ली वक्फ बोर्डाच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोपही करण्यात आला. त्यानंतरच त्यांच्यावर मनी लाँड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ईडी कार्यालयात पोहोचण्यापूर्वी त्यांनी दावा केला होता की, जेव्हा ते वक्फ बोर्डाचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी नियमांचे पालन केले. त्याचबरोबर 2013 मध्ये पारित केलेल्या कायद्यानुसार (बोर्डासाठी) काम केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.