Allahabad High Court Dainik Gomantak
देश

Crime News: 15 व्या वर्षी लग्न, दोनदा तीन तलाक अन् हलालाचा 'नरक'! लैंगिक शोषणाच्या प्रकरणावर हाय कोर्टाने ओढले ताशेरे; म्हणाले, 'अशा प्रथा...'

Allahabad High Court Judgment Triple Talaq Halala: उत्तर प्रदेशातील एका महिलेवरील अत्यंत क्रूर लैंगिक शोषणाच्या प्रकरणाची सुनावणी करताना अलाहाबाद हाय कोर्टाने तीन तलाक आणि हलाला या प्रथांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले.

Manish Jadhav

Allahabad High Court Judgment Triple Talaq Halala: उत्तर प्रदेशातील एका महिलेवरील अत्यंत क्रूर लैंगिक शोषणाच्या प्रकरणाची सुनावणी करताना अलाहाबाद हाय कोर्टाने तीन तलाक आणि हलाला या प्रथांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. न्यायालयीन सुनावणी दरम्यान कोर्टाने स्पष्ट केले की, तीन तलाक आणि हलाला यांसारख्या कुप्रथांच्या नावाखाली कोणत्याही महिलेच्या किंवा अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाची परवानगी दिली जाऊ शकत नाही.

अशा अमानुष प्रथा मानवी आत्म्याला हादरवून टाकणाऱ्या असून त्या समाजाचे एक 'काळे पान' आहेत. या प्रथा भारतीय संविधानाने दिलेल्या मूल्यांच्या, समानतेच्या आणि मानवी प्रतिष्ठेच्या पूर्णपणे विरोधात आहेत, असेही न्यायालयाने म्हटले. न्यायमूर्ती जे. जे. मुनीर आणि न्यायमूर्ती तरुण सक्सेना यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पीडितेचा पूर्वाश्रमीचा पती, काका, मौलाना आणि इतर सह-आरोपींनी दाखल केलेल्या याचिका फेटाळून लावल्या. एका अल्पवयीन मुलीवर अत्यंत नियोजित पद्धतीने सामूहिक बलात्कार करण्यात आला असून या प्रकरणाच्या सखोल तपासाची गरज असल्याचे कोर्टाने अधोरेखित केले.

हे संपूर्ण धक्कादायक प्रकरण उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यातील असून पीडितेने सैदनागली पोलीस ठाण्यात या संदर्भातील तक्रार दाखल केली होती. पीडितेच्या आरोपानुसार, ती अल्पवयीन असतानाच तिचा जबरदस्तीने विवाह लावून देण्यात आला होता. त्यानंतर तिच्या पतीने तिला तीन तलाक दिला आणि हलालाच्या नावाखाली तिच्यावर अत्याचार करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता तिचा दुसरा विवाह लावून पुन्हा तीन तलाक देण्यात आला आणि नंतर 'डबल हलाला'च्या नावाखाली तिच्यावर अमानुष सामूहिक बलात्कार करण्यात आला.

पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, एप्रिल 2025 मध्ये अवघ्या 15 वर्षांची असताना तिचा विवाह अजहर नवाज नावाच्या आरोपीशी झाला होता. त्यानंतर जानेवारी 2016 मध्ये तिला पहिला तीन तलाक देण्यात आला. काही महिन्यांनंतर पतीने पुन्हा लग्न करण्याची इच्छा दर्शवली, पण त्यासाठी मौलाना कयूम नावाच्या व्यक्तीसोबत तिचे जबरदस्तीने हलाला करण्यात आले. त्यावेळी ती केवळ 16 वर्षांची होती आणि तिला हलाला या शब्दाचा अर्थही माहीत नव्हता.

2017 मध्ये तिचा दुसरा विवाह झाला, परंतु 4 वर्षांनी आरोपीने तिला पुन्हा तीन तलाक देऊन दुसऱ्या महिलेशी लग्न केले. जेव्हा त्याच्या दुसऱ्या पत्नीला मूल झाले नाही, तेव्हा त्याने तिसऱ्यांदा पीडितेशी लग्न (Marriage) करण्याचा घाट घातला. या वेळी 'डबल हलाला'च्या नावाखाली नवाजचे भाऊ आणि पुतण्यांनी 19 फेब्रुवारी 2025 रोजी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला आणि त्याच संध्याकाळी तिचा तिसऱ्यांदा नवाजसोबत निकाह लावून दिला. या गंभीर गुन्ह्याची कोर्टाने तीव्र दखल घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

SCROLL FOR NEXT