T20 World Cup 2026: संयुक्त अरब अमिरातीने (UAE) आगामी आयसीसी मेन्स टी20 विश्वचषक 2026 मध्ये आपली जागा अधिकृतरित्या निश्चित केली. मोहम्मद वसीमच्या नेतृत्वाखालील यूएई संघाने ओमानमध्ये झालेल्या आशिया/ईस्ट एशिया-पॅसिफिक (EAP) क्वालिफायर स्पर्धेत जपानचा पराभव करत विश्वचषकासाठी पात्रता मिळवली. या विजयासह यूएई हा टी20 विश्वचषक 2026 मध्ये पोहोचणारा 20वा आणि शेवटचा संघ बनला. हा विश्वचषक स्पर्धा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळली जाणार आहे.
दरम्यान, 2026 चा टी20 विश्वचषक सलग दुसऱ्यांदा 20 संघांचा असेल. क्रिकेटचा प्रसार जगाच्या कानाकोपऱ्यात व्हावा, या आयसीसीच्या व्यापक योजनेचा हा एक भाग आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच नेपाळ आणि ओमान या संघांनी आपापले टॉप-3 स्थान निश्चित केले होते. आता यूएईच्या (UAE) विजयामुळे विश्वचषकातील 20 संघांची अंतिम यादी पूर्ण झाली.
दुसरीकडे, सुपर सिक्स टप्प्यातील जपानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात यूएईने सुरुवातीपासूनच आपला दबदबा कायम ठेवला. जपानच्या डावाची सुरुवात अडखळत झाली, ज्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. यष्टिरक्षक फलंदाज वातारु मियाउची (नाबाद 45 धावा, 32 चेंडू) याच्या संयमी खेळीमुळे जपानने कसेबसे 116 धावा केल्या.
या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईचा कर्णधार मोहम्मद वसीम (42 धावा, 26 चेंडू) आणि अलीशान शराफू (46 धावा, 27 चेंडू) यांनी आक्रमक फलंदाजी केली आणि केवळ 13 षटकांतच लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. या विजयामुळे यूएईने केवळ विश्वचषकाचे तिकीटच मिळवले नाही, तर जपान, कतार आणि सामोआ या संघांच्या विश्वचषकात जाण्याच्या आशाही संपुष्टात आणल्या.
भारत (यजमान), श्रीलंका (यजमान), अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, वेस्टइंडीज, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, कॅनडा (Canada), इटली, नेदरलँड्स, नामिबिया, झिम्बाब्वे, नेपाळ, ओमान आणि यूएई.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.