Shraddha Murder Case Dainik Gomantak
देश

Shraddha Murder Case: 'मोदी सरकारमुळे श्रद्धासारखे प्रकरण घडले...', AIUDF च्या MLA चे वादग्रस्त वक्तव्य

Aminul Islam's Remarks: दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे.

दैनिक गोमन्तक

AIUDF MLA Controversial Statement: दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. आरोपी आफताबने श्रद्धाचे 35 तुकडे करुन मेहरौलीच्या जंगलासह विविध ठिकाणी फेकून दिले. पोलीस अजूनही श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधण्यात गुंतले आहेत. दरम्यान, आसाममधील AIUDF आमदार अमिनुल इस्लाम यांचे श्रद्धा हत्या प्रकरणाबाबत वादग्रस्त वक्तव्य समोर आले आहे. आमदार अमिनुल इस्लाम म्हणाले की, 'श्रद्धासारखे प्रकरण मोदी सरकारमुळे घडले.'

अमिनुल इस्लाम यांनी मोदी सरकारवर आरोप केले

एआययूडीएफचे आमदार अमिनुल इस्लाम म्हणाले की, 'मोदी सरकार येण्यापूर्वी अशा घटना घडल्या नाहीत. भाजप विकासाच्या नावावर मतं मागत नाही. नरेंद्र मोदी (Narendra Modi) दीर्घकाळ सत्तेत राहिले तर प्रत्येक शहरात असे प्रकार घडत राहतील.'

आफताबने 35 श्राद्ध केले

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा ही आरोपी आफताबची लिव्ह इन पार्टनर होती. दोघेही दिल्लीतील छतरपूर भागात राहत होते. 18 मे 2022 रोजी आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला. यानंतर, श्रद्धाचा मृतदेह लपवण्यासाठी त्याने करवतीने तिचे 35 तुकडे केले आणि सुमारे 3 आठवडे घरात ठेवले. मृतदेहाचे तुकडे कुजू नयेत म्हणून आफताबने नवीन फ्रीजही घेतला होता.

मेहरौलीच्या जंगलात फेकून दिलेला मृतदेह

आरोपानुसार, आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे मेहरौलीच्या जंगलात फेकून दिले. मात्र, नंतर तपासात आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे अनेक ठिकाणी फेकल्याचे समोर आले. शुक्रवारी पोलीस मृतदेहाचे तुकडे शोधण्यासाठी हरियाणातील गुरुग्राम येथेही गेले होते.

आफताबची नार्को टेस्ट होणार

आरोपी (Accused) आफताब तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. त्यानंतर न्यायालयाने आफताबच्या नार्को टेस्टला परवानगी दिली. आता नार्को टेस्टच्या मदतीने आफताबला सत्य उघड करण्यास भाग पाडले जाईल आणि श्रद्धा हत्याकांडाचे सत्य समोर येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT