Air Polution  DainikGomantak
देश

...तर भारतीयांचे आयुर्मान पाच वर्षांनी होणार कमी

भारत हा दुसरा सर्वात प्रदूषित देश

दैनिक गोमन्तक

भारताची राजधानी दिल्ली यापुर्वी बऱ्याचदा प्रदुषणाच्या मुद्यावरुन चर्चेत आली होती. तसेच प्रदुषणाच्या मुद्यावरुन अनेक चर्चा घडल्या मात्र हा प्रश्न समूळ संपू शकला नाही. यापार्श्वभूमीवर शिकागो विद्यापीठातील ऊर्जा धोरण संस्थेने भारताच्या प्रदुषणावरुन माहिती देणारा एक संशोधन अहवाल नुकताच जाहीर केला आहे. या अहवालातून धक्कादायकबाब समोर आली आहे. ती म्हणजे भारत हा जगातील दुसरा सर्वात प्रदूषित देश म्हणून गणला गेला आहे. (Air pollution will reduce the lives of Indian citizens sst93 )

या अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार येत्या काळात वायू प्रदूषणामुळे भारतीयांचे आयुर्मान पाच वर्षांनी कमी होण्याची शक्यता असल्याचं ही यातून स्पष्ट झाले आहे. “नवी दिल्लीसह मध्य, पूर्व आणि उत्तर भारतातील लोक मोठ्या प्रमाणात प्रदुषित भागांमध्ये राहतात. तसेच, गेल्या काही वर्षात भारताच्या वायू प्रदूषणाच्या पातळीचा भौगोलिकदृष्ट्या विस्तार झाला असून हवेची गुणवत्ता लक्षणीय खराब झाली आहे.” असे ही स्पष्ट झालं आहे.

वायू प्रदूषण हा भारतातील मानवी आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका आहे. दिल्ली हे भारतातील सर्वात जास्त प्रदुषित राज्य आहे. जागतिक स्तरावर भारत हा जगातील दुसरा सर्वात प्रदूषित देश आहे. भारतात २०२० साली खराब हवेमुळे नागरिकांचे आयुर्मान 6.9 वर्षांनी कमी झाले. नेपाळचे (4.1 वर्षे), पाकिस्तान (3.8 वर्षे) आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोतील लोकांचे आयुष्य 2.9 वर्षांनी कमी झाल्याचे समोर आले आहे. ईपीआयचीच्या निष्कर्षांनुसार, शेजारील बांगलादेशने जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या पातळीवर हवेचा दर्जा सुधारल्यास तेथील सरासरी आयुर्मान 5.4 वर्षांनी वाढू शकते.

या अहवालानुसार 2013 पासून जगभरातील प्रदूषणात सुमारे 44 % वाढ भारतात झाली आहे. भारताच्या लोकसंख्येच्या सुमारे 40 %, सध्याचे प्रदूषण स्तर कायम राहिल्यास, सरासरी 7.6 वर्षे आयुर्मान भारतीय गमवू शकतात. तसेच अतिसुक्ष्म असे कण बराच वेळ हवेत तरंगत राहतात आणि श्वासनलिकेद्वारे शरीरात जातात. त्यामुळे वेगवेगळे रोग होऊ शकतात. अशी ही शक्यता यातून स्पष्ट झाली आहे. त्यामूळे भारतीय शासनकर्ते या अहवालाचा गांभिर्याने विचार करत काही ठोस पावले उचलणार का ? याकडे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT