Dubai - Delhi Flight  Dainik Gomantak
देश

Air India: मैत्रीसाठी काहीपण? पायलटने कॉकपिटमध्ये बसवले मैत्रिणीला; तिथेच केली जेवण, दारूची सोय

पायलटने सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले असल्याचे, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) सांगितले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Dubai - Delhi Flight: एअर इंडियाच्या पायलटने मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बसवून आणि क्रूला तिच्या खाण्यापिण्याची सोय करून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी डीजीसीएने संशयित आरोपी पायलटविरुद्ध तपास सुरू केला आहे.

पायलटने सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले असल्याचे, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) सांगितले आहे. 27 फेब्रुवारी 2023 रोजी विमान दुबईहून दिल्लीला जात असताना ही घटना घडली.

दुबईहून दिल्लीला जात असताना एअर इंडियाच्या पायलटने महिला मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बसण्याची परवानगी दिली. या प्रकरणी केबिन क्रूच्या सदस्याने तक्रार केली होती. विमानातील एका क्रू मेंबरने तक्रार केली की वैमानिकाने आपल्या महिला मैत्रिणीला कॉकपिटमध्ये प्रवेश दिला होता आणि तिथेच तिला खाणे आणि पिण्यासाठी मद्य दिले होते.

एव्हिएशन रेग्युलेटर डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत आणि एअरलाइनने पायलटला चौकशी प्रलंबित ठेवली आहे.

क्रू मेंबरच्या तक्रारीनुसार, पायलटने केबिन क्रूला विचारले होते की बिझनेस क्लासमध्ये काही जागा रिक्त आहेत का? कारण तिची मैत्रीण इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करत होती. पायलटला ते अपग्रेड करायचे होते. क्रू मेंबरने त्याला एकही सीट रिकामी नसल्याची माहिती दिली, त्यानंतर पायलटने कॉकपिटमध्येच तिची बसण्याची व्यवस्था केली. याशिवाय तेथे अन्न आणि दारूची देखील व्यवस्था करण्यास सांगितले.

एअर इंडियाच्या प्रवक्त्याने शुक्रवारी याबाबत माहिती दिली आहे. 'एअरलाइन प्रवाशांची सुरक्षा आणि काळजी या बाबींमध्ये कोणतीही चूक खपवून घेणार नाही आणि या घटनेबाबत आवश्यक ती कारवाई करेल.'

डीजीसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'नियामक या प्रकरणाची चौकशी करत आहे. तपास पथक तांत्रिक आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संबंधित तथ्ये तपासेल.'

' एअर इंडियाने चौकशीसाठी एक समितीही स्थापन केली आहे.' असे एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT