AIMIM President Asaduddin Owaisi attacks on Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
देश

'मोदींना संसदेच बांधकाम बघण्यासाठी वेळ मात्र...', ओवेसींचा पंतप्रधानांवर घणाघात

यूपी विधानसभा निवडणूक 2022 च्या आधी कार्यकर्त्यांना उत्साह देण्यासाठी ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी आज बहराइच (Bahraich) येथे एका रॅलीला संबोधित केले

दैनिक गोमन्तक

यूपी विधानसभा निवडणूक 2022 (Uttar Pradesh Assembly Election) च्या आधी कार्यकर्त्यांना उत्साह देण्यासाठी ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी आज बहराइच (Bahraich) येथे एका रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजप सरकार (Yogi Government) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. अमेरिकेच्या (USA) दौऱ्यावरुन परत येताच पंतप्रधान रात्री संसदेची (New Parliament) नवीन इमारत पाहण्यासाठी गेले, पण जेव्हा यूपीच्या गरीब लोकांचे मृतदेह पाण्यात तरंगत होते, तेव्हा पंतप्रधान इथे आले नाहीत.असा घणाघात ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे.(AIMIM President Asaduddin Owaisi attacks on Prime Minister Narendra Modi)

कोरोनाच्या काळात झालेल्या मृत्यूंबाबत ओवेसींनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे . ते म्हणाले की, पंतप्रधानांना अमेरिकेतून परत येताच रात्री संसद भवनची नवीन इमारत पाहण्याची आठवण झाली .मात्र जेव्हा यूपीमध्ये गरीबांचे मृतदेह पाण्यात तरंगत होते, तेव्हा पंतप्रधानांना उत्तर प्रदेशात यायला वेळ नव्हता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान उत्तर प्रदेशातील गंगेत मोठ्या प्रमाणात मृतदेह तरंगताना दिसले. त्या काळात विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. आता ओवेसींनी पुन्हा एकदा बहराइच रॅलीमध्ये हा मुद्दा उपस्थित केला आहे.

असदुद्दीन ओवैसी यूपीमध्ये एआयएमआयएम या आपल्या पक्ष वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. ते सातत्याने उत्तर प्रदेशाचा दौरा करत आहेत. आज याच रॅलीत बहराइचमध्ये त्यांनी भाजप आणि सपावर जोरदार हल्ला चढवला आहे . ओवेसी यांनी भाजपच्या सबका साथ, सबका विकासच्या घोषणेची खिल्ली उडवली आहे . एआयएमआयएमचे नेते म्हणाले की कोरोनाच्या काळात लोकांना औषधे आणि ऑक्सिजन देखील मिळू शकत नाही. उपचाराशिवाय गरीबांचे हाल होत राहिले.

ओवैसी यांनी स्पष्ट केले की ते उत्तर प्रदेशात मते कापण्यासाठी आलेले नाहीत. एआयएमआयएम ही विधानसभा निवडणूक जोरदार लढेल. ते म्हणाले की जेव्हा त्यांचा पक्ष शिवसेनेला पराभूत करू शकतो तर मग भाजपला का नाही. अलीकडेच ते प्रयागराजलाही पोहोचले होते. तेथे ओवेसींनी भाजपच्या विभाजन करण्याचे राजकारण करताना मुस्लिमांना त्यांचे नेते निवडण्याचे आवाहन केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT