Air India 787 crash Dainik Gomantak
देश

अहमदाबाद ते लंडन! 'तीच' विमानयात्रा, 'तोच' मार्ग; अपघातानंतर 'Air India-171' विमानातून प्रवास करणारे काय म्हणाले?

Ahmedabad to London Air India: अपघातग्रस्त AI 171 विमानाचेच हे पुनर्क्रमांकित स्वरूप असल्याने, विमानतळावर नेहमीपेक्षा अधिक शांतता होती

Akshata Chhatre

अहमदाबाद: अहमदाबादमध्ये चार दिवसांपूर्वी झालेल्या भीषण विमान अपघाताची भीती मनात असतानाही काही प्रवाशांनी १६ जून रोजी त्याच अहमदाबाद-गॅटविक मार्गावरील विमानाने (AI 159) पुन्हा प्रवास केला. अपघातग्रस्त AI 171 विमानाचेच हे पुनर्क्रमांकित स्वरूप असल्याने, विमानतळावर नेहमीपेक्षा अधिक शांतता होती.

लंडनमध्ये दुकान सहायक म्हणून काम करणारे ३४ वर्षीय जयेश रामजी हे १२ जूनच्या अपघातग्रस्त AI 171 विमानाचे प्रवासी होते, ज्यात २४१ प्रवासी आणि कर्मचारी मृत्युमुखी पडले. मात्र, ऐनवेळी आजारी आईसोबत थांबण्याच्या निर्णयामुळे त्यांचा जीव वाचला. सोमवारी (१६ जून) ते पुन्हा त्याच मार्गावरील AI 159 विमानाने (AI 171 चे पुनर्क्रमांकित स्वरूप) लंडनला निघाले.

गेल्या सात वर्षांपासून लंडनमध्ये राहणारे रामजी यांनी इंग्रजीमधील टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, "आईची तब्येत बरी नसल्याने मी प्रवास १६ जूनपर्यंत पुढे ढकलला. आता फक्त सुरक्षितपणे घरी पोहोचावे अशी आशा आहे." त्यांच्याप्रमाणेच अनेकांच्या मनात एक शांत भीती होती. विमानतळाचे टर्मिनल नेहमीपेक्षा शांत होते.

प्रवासातील विलंब आणि भावनांचा कल्लोळ

दुपारी १:१० वाजता सुटणारे हे विमान तीन तासांपेक्षा अधिक उशिराने, म्हणजेच दुपारी ४:३० वाजता निघाले. लंडनमध्ये एका लॉजिस्टिक्स फर्मच्या ऑपरेशन्स टीममध्ये काम करणारे २८ वर्षीय रास मिश्रा या रांगेत उभे होते. त्यांच्या आई-वडिलांनी डोळ्यात पाणी आणून त्यांना निरोप दिला.

"मी सुद्धा घाबरलो आहे, पण मी यापूर्वी एअर इंडियाने प्रवास केला आहे आणि जरी प्रवास नेहमी आरामदायक नसला तरी, मला त्यांच्या वैमानिकांवर विश्वास आहे," असे मिश्रा यांनी टाइम्सला सांगितले.

याच विमानातून २१ वर्षीय सबीना कासमी यूकेमधील तिचे वडील आणि भावंडांकडे परत जात होती. तिची आई, अमीना, मात्र चिंतेत होती. "अपघात झाल्यापासून मला झोप लागली नाही. ती त्याच मार्गावरून प्रवास करत आहे," असे त्या म्हणाल्या.

अहमदाबादमध्ये कुटुंबाला भेटून यूकेमधील पतीकडे परतणाऱ्या रिद्धी नावाच्या आणखी एका तरुणीसाठी हा क्षण गोड-कडू अनुभवाचा होता. "लग्नानंतरचा माझा हा दुसरा प्रवास आहे. मी माझ्या कुटुंबासोबत राहून आनंदी होते, पण आता मला सुरक्षितपणे त्याच्याकडे परत जायचे आहे". असे ती म्हणाली

कोणत्याही बातम्यांची हेडलाइन बनू नये

जेव्हा AI 159 नेउड्डाण केले, तेव्हा प्रत्येक प्रवाशाच्या मनात एकच सामायिक इच्छा होती; हा प्रवास केवळ एक सामान्य प्रवास असावा आणि कोणत्याही बातम्यांची हेडलाइन बनू नये. शेवटी एअर इंडियाने हा विमान प्रवास यशस्वी केला आणि प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT