Boeing controversy aviation Dainik Gomantak
देश

इंजिन रिस्टार्टचा प्रयत्न अयशस्वी, Boeing कंपनीवर प्रश्नचिन्ह; अहमदाबाद विमान अपघातावर वैमानिकाचे धक्कादायक विश्लेषण

Ahmedabad Plane Crash: अकासा विमान कंपनीत कार्यरत असलेले अनुभवी वैमानिक तपेश कुमार यांनी एक सविस्तर विश्लेषण सादर केले

Akshata Chhatre

Ahmedabad Crash Analysis: अहमदाबाद येथे नुकत्याच झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला असून, धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, विमानाच्या दोन्ही इंजिनांना इंधन न मिळाल्याने विमान कोसळले. मात्र, इंधन पुरवठा ठप्प होण्यामागे नेमके कारण काय असावे, हा प्रश्न सध्या अनेकांच्या मनात आहे. यावर अकासा विमान कंपनीत कार्यरत असलेले अनुभवी वैमानिक तपेश कुमार यांनी एक सविस्तर विश्लेषण सादर केले आहे, जे या दुर्घटनेमागील काही संभाव्य कारणे दर्शवते.

उड्डाणादरम्यान अनपेक्षित घटनाक्रम

तपेश कुमार यांच्या विश्लेषणानुसार, उड्डाण आणि उड्डाणपूर्व प्रक्रिया सामान्य होत्या आणि विमान सुरळीतपणे उड्डाण करत होते. मात्र, लिफ्टऑफनंतर अवघ्या ३ सेकंदांनी, इंजिन इंधन स्विचेस एका सेकंदाच्या अंतराने एकामागून एक कटऑफ स्थितीत गेले. विशेष म्हणजे, साधारणपणे इंजिन सुरू करताना हे स्विचेस 'चालू' (Run) स्थितीवर ठेवले जातात आणि विमान पार्क करेपर्यंत ते 'चालू' स्थितीतच राहतात. इंजिन बंद करण्यासाठीच ते 'कटऑफ' वर हलवले जातात.

सुरक्षितता वैशिष्ट्यांवर प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर १० सेकंदांनी, डाव्या इंजिनसाठी कटऑफ स्विच पुन्हा 'चालू' स्थितीवर हलवला गेला आणि त्यानंतर ४ सेकंदांनी उजव्या इंजिनचा स्विच देखील 'चालू' वर हलवला गेला. तपेश कुमार यांनी यावर भर दिला आहे की, सुरक्षिततेसाठी हे स्विचेस वर किंवा खाली हलवण्यापूर्वी ते बाहेर खेचणे आवश्यक असते. यामुळे स्विचची अनवधानाने होणारी हालचाल रोखता येते.

मात्र, एफएएच्या (FAA) २०१८ च्या एका बुलेटिनमध्ये असे म्हटले आहे की, काही बोईंग विमानांमध्ये हीच सुरक्षा प्रक्रिया निष्क्रिय केली जाऊ शकतो. त्यामुळे अपघातग्रस्त विमानात हीच 'पुल आउट बिफोर मूव्ह' सुरक्षा प्रक्रिया सक्रिय होती की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामुळेच इंजिन इंधन स्विचेस 'कटऑफ' स्थितीवर का गेले, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

इंजिन रिस्टार्टचा अयशस्वी प्रयत्न आणि वेळेचा अभाव

उड्डाणानंतर १३ सेकंद आणि १७ सेकंदांनी स्विचेस पुन्हा 'चालू' स्थितीवर हलवल्यानंतर, इंजिन संगणकांनी इंजिन आपोआप रीस्टार्ट करण्याचा प्रयत्न केला. पण, जेट इंजिन पूर्णपणे सुरू होण्यास १ ते २ मिनिटांचा वेळ लागतो. दुर्दैवाने, विमान पुरेसे उंचीवर नव्हते आणि इंजिन पूर्णपणे सुरू होण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, ज्यामुळे ही दुर्घटना घडली असे तपेश कुमार यांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सात दिवसांचा थरारक ट्रेक! पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सर केले किलिमांजारो शिखर, ठरले भारतातील 'पहिले महापौर'!

Vijayanagara Empire Goa: राजा देवराय याने 'गोवा' आपल्या आधिपत्याखाली आणला, विजयनगर साम्राज्याचा इतिहास

IND vs ENG 3rd Test: टीम इंडियाने षटकारांच्या बाबतीत रचला इतिहास, 50 वर्ष जुना विक्रम काढला मोडीत

Beti Ferry Boat: 'बेती' फेरीबोट प्रकरणाबाबत धूसरता; सरकारकडे चौकशी अहवाल सादर, पण 'ते' कारण अद्याप गुलदस्त्यात

Goa Politics: विरोधकांमधील फूट पुन्हा उघड! 'त्या' बैठकीवरुन सरदेसाईंचे युरींवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT