Agra Lucknow Expressway Accident Dainik Gomantak
देश

VIDEO: 60 प्रवाशांनी भरलेली भरधाव बस अचानक उलटली! आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; प्रवाशांमध्ये एकच खळबळ

Agra Lucknow Expressway Accident: उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर प्रवाशांनी भरलेल्या खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे.

Sameer Amunekar

उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर प्रवाशांनी भरलेल्या खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेली बस अचानक चालकाच्या नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या बसमधून सुमारे 50 ते 60 प्रवासी प्रवास करत होते. ही बस हरियाणातील रेवाडी येथून बिहारमधील छपरा येथे जात होती. अपघाताच्या वेळी बहुतांश प्रवासी झोपेत असल्याने त्यांना स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळाली नाही. या दुर्घटनेनंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊमधील पारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झिरो पॉइंट मोहानजवळ हा अपघात झाला. राजस्थानहून प्रवाशांना घेऊन बिहारच्या दिशेने निघालेली ही बस आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवरून जात होती. प्रवासादरम्यान बसचा वेग जास्त असल्याने एका ठिकाणी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला जाऊन खोलगट भागात पलटी झाली. बसमध्ये सुमारे 50 ते 60 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता.

झोपेत असलेल्या प्रवाशांमध्ये उडाली घबराट

अपघात झाला त्यावेळी बसमधील बहुतांश प्रवासी झोपले होते. अचानक बस पलटी झाल्याने अनेक प्रवासी सीटमध्ये आणि बसच्या आतील भागात अडकले. काहींना बाहेर पडण्यासाठी दरवाजे आणि खिडक्यांचा आधार घ्यावा लागला. दुर्घटनेनंतर घटनास्थळी आरडाओरड आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अपघाताची तीव्रता लक्षात घेता आसपासच्या नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि प्रशासनाला माहिती दिली.

खिडक्यांमधून प्रवाशांची सुटका; जखमी रुग्णालयात दाखल

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, रुग्णवाहिका आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. बसचे दरवाजे आणि खिडक्यांमधून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात आणि ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून जखमींवर उपचार सुरू आहेत.

क्रेनच्या मदतीने बस हटवण्याचे काम सुरू

अपघातानंतर उलटलेली बस हटवण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. एक्सप्रेसवेवरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, बस नेमकी कोणत्या कारणामुळे पलटी झाली, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. चालकाचा वेग, वाहनावरील नियंत्रण आणि अपघाताच्या वेळी असलेली परिस्थिती यासह विविध बाबींची चौकशी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India U19 Semi Final Qualification: पाकिस्तानकडून पराभव, तरीही टीम इंडियासाठी सेमीफायनलचे दरवाजे खुले! UAE विरुद्धचा सामना ठरणार निर्णायक; जाणून घ्या संपूर्ण समीकरण

8th Pay Commission: 12 महिन्यांची थकबाकी अन् खात्यात 5 लाखांहून अधिक रुपये! समजून घ्या संपूर्ण गणित

Sexual Assault: संतापजनक घटना! म्हापशात तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; पोलिसांकडून तपास सुरू

Diwali Fire Accidents: दिवाळीचा आनंद शोकात बदलला! मध्य प्रदेश ते महाराष्ट्र, आसामपर्यंत आगीच्या दुर्घटनांमध्ये 30 हून अधिक बळी; अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर

IND vs NZ 3rd ODI: वनडे मालिकेदरम्यान न्यूझीलंडला दुहेरी झटका, 2 स्टार गोलंदाज बाहेर; संघात नव्या खेळाडूची एंट्री

SCROLL FOR NEXT