केंद्र सरकारने घोषित केलेल्या 'अग्निपथ' घोषणेला विरोध करण्यासाठी देशभरात अनेक ठिकाणी नागरिकांकडून निदर्शने सुरु आहेत. या निदर्शनांमध्ये अनेक ठिकाणी जमावाने हिंसक होत जाळपोळ केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तर काही ठिकाणी जमावाने ट्रेन पेटवल्याची घटना ही घडल्या आहेत.असे असले तरी देशातील अनेक दिग्गज उद्योजकांनी अग्निपथ योजनेचे समर्थन केले आहे. ( Agnipath protest industry leaders says Dont worry corporate jobs potential )
याबाबत बोलताना देशातील अनेक दिग्गज उद्योजकांनी काळजी करू नका, कॉर्पोरेट क्षेत्रात रोजगाराच्या भरपूर संधी आहेत. असे म्हणत युवकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, आरपीजी एंटरप्रायझेसचे चेअरमन हर्ष गोयंका आणि बायोकॉन लिमिटेडचे चेअरपर्सन किरण मुझुमदार-शॉ यांनी सोमवारी लष्करी भरतीसाठी अग्निपथ योजनेचे समर्थन करताना युवकांसाठी हा पर्याय उपलब्ध असल्याचं म्हटले आहे.
याबाबत महिंद्राने ट्विट केले की, 'अग्निपथ कार्यक्रमाविरोधात झालेल्या हिंसाचारामुळे दु:ख झाले आहे. गेल्या वर्षी जेव्हा या योजनेचा विचार केला गेला तेव्हा मी म्हणालो होतो आणि तो मुद्दा पुन्हा पुन्हा सांगतो - अग्निवीरांची शिस्त आणि कौशल्य त्यांना रोजगारक्षम बनवेल. तसेच 'महिंद्रा समूह अशा प्रशिक्षित, सक्षम तरुणांना नियुक्त करण्याच्या संधीचे स्वागत करतो. असे ही या उद्योजकांनी म्हटले आहे.
तसेच अनेक प्रमुख उद्योजकांनी या योजनेवर सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. महिंद्रा ग्रुप अग्निवीरांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी देईल असे सांगितले. तसेच नेतृत्व, सांघिक कार्य आणि शारीरिक प्रशिक्षणासह, हे अग्निवीर उद्योगाला बाजारासाठी तयार व्यावसायिक उपाय प्रदान करतात. तसेच आरपीजी ग्रुप अग्निवीरांना कामावर ठेवण्याच्या या संधीचे देखील स्वागत करतो. असे म्हटले आहे. अशाच मतांचा प्रतिध्वनी करत, मजुमदार-शॉ यांनी ट्विटमध्ये आढळतो आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.