Piyush Goyal Dainik Gomantak
देश

Piyush Goyal: भारत-ऑस्ट्रेलिया व्यापारी करारानंतर मोदी सरकारमधील मंत्र्याचं मोठं वक्तव्य

Piyush Goyal: भारत आणि ऑस्ट्रलिया दरम्यान व्यापारात वाढ होऊन 70 अमेरिकी डॉलर पर्यत जाण्याची शक्यता असल्याचेही पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Piyush Goyal: भारत-ऑस्ट्रलिया यांच्यात मुक्त व्यापार करार लागू झाला आहे. यादरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी 2023 मध्ये आणखी दोन देशांबरोबर मुक्त व्यापार करार लागू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

याबरोबरच ब्रिटन, युरोपीय देशांसोबत वाटाघाटी सुरु असल्याचे पीयुष गोयल यांनी म्हटले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराच्या लागू झाल्याच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुक्त व्यापार करारानंतर ऑस्ट्रेलियाला निर्यात केल्या जाणाऱ्या भारतीय वस्तूमध्ये कपडे, रत्ने व आभूषणे यांचा समावेश होईल. याबरोबरच, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासह अनेक क्षेत्रांना फायदा होईल.

दरम्यान, भारतीय माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांचे एकटय़ा ऑस्ट्रेलियाला होणाऱ्या सेवांच्या निर्यातीत सध्याच्या 20 कोटी डॉलरवरून पुढील पाच-सात वर्षांत पाच पटीहून अधिक वाढ होऊन ती 100 कोटी डॉलरपर्यंत वाढेल अशी अपेक्षा असल्याचे म्हटले आहे. भारत( India ) आणि ऑस्ट्रलिया दरम्यान व्यापारात वाढ होऊन 70 अमेरिकी डॉलर पर्यत जाण्याची शक्यता असल्याचेही पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: आजी-माजी प्रदेशाध्यक्ष शेजारी-शेजारी!

Parliament Monsoon Session: संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून; मतदारसंघ फेररचना विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शक्यता

Goa Housing Society: सोसायटीतील भांडणं, तक्रारी आणि वादांना मिळणार पूर्णविराम! सरकार स्थापन करणार 'सहारा' प्राधिकरण

Shreyas Iyer: 4 सामन्यात एकही विजय नाही... सरपंच साहेबांना यशाचा सूरच गवसेना! श्रेयस अय्यरच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

Goa Rainfall: राज्यात गेल्या 24 तासांत सरासरी 23.9 मिमी पावसाची नोंद, 30 इंचांचा टप्पा पार; चार दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी

SCROLL FOR NEXT