Satyanarayan Katha Dainik Gomantak
देश

संस्कृत अन् हिंदी पाठोपाठ आता इंग्रजीतही सत्यनारायण कथा होऊ लागली, Video

संस्कृत आणि हिंदीनंतर आता इंग्रजीतही सत्यनारायण कथेचे पठण केले जात आहे.

दैनिक गोमन्तक

संस्कृत आणि हिंदीनंतर आता इंग्रजीतही सत्यनारायण कथेचे पठण केले जात आहे. होय, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये भडजी सत्यनारायण कथा (Satyanarayan Katha) इंग्रजीमध्ये सांगताना दिसून येत आहे. कुटुंबातील सदस्य तिथे बसून कथा ऐकत आहेत ज्यात पुरुष, महिला आणि लहान मुले देखील दिसून येत आहेत. (After Sanskrit and Hindi now Satyanarayan story has started in English too Video)

व्हिडिओमध्ये दिसणारे पूजा साहित्य आणि ते ज्या पद्धतीने मांडले आहे ते दक्षिण भारतीय संस्कृतीचे असल्याचे दिसून येत आहे. दक्षिण भारतातील अनेक भागात इंग्रजी बोलली जाते आणि हा व्हिडिओ दक्षिण भारतातील एका घराचा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हजारो वेळा पाहिला गेला आहे आणि त्यावर अनेक प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.

सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत

व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, 'चला, हिंदू धर्माचे ज्ञान आता ब्रिटिशांनाही मिळणार. 'त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, भारत प्रगतीत आहे. त्याचबरोबर काही लोकांनी याला क्रांतिकारीही म्हटले.'भटजी आता अपग्रेड झाले' असेही काही लोक म्हणत आहेत.

हिंदू धर्मात सत्यनारायण पूजेचे विशेष महत्त्व

हे ज्ञात आहे की श्रावण महिन्यातील सत्यनारायण पूजेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात अनेक घरांमध्ये सत्यनारायण पूजा केली जाते. सत्याची नारायण रूपात पूजा करणे म्हणजेच भगवान श्री सत्यनारायणाची पूजा आहे. भगवान श्री सत्यनारायण व्रत कथा ही सर्वात आदरणीय व्रत कथा म्हणून सांगितली गेली आहे तसेच जगात नारायण हे एकमेव सत्य आहे, बाकी सर्व माया आहे, असे देखील म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vinoo Mankad Trophy: गुजरातचा गोव्यावर दणदणीत विजय! 5 लढतीतील चौथा पराभव; गटसाखळीत हाराकिरी

Goa Today's News Live: वीज कोसळून 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू? कोलवा येथे रुमच्या बाहेर आढळला मृतदेह

Netravali: 'एसी'त बसणारे ग्रामीण जनतेला सुखाने जगू देत नाहीत! व्‍याघ्र प्रकल्‍पावरुन फळदेसाईंचा टोला; नेत्रावळी ग्रामस्थांचा विरोध

Rama Kankonkar: 'मोबाईलचा डेटा फॉरमॅट का केला'? हल्लाप्रकरणी रामा, जेनिटोंचे वकील भिडले; अटक बेकायदेशीर असल्याचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; दिगंबर कामत लहान कसे?

SCROLL FOR NEXT