hanuman jayanti 2023 Dainik Gomantak
देश

Hanuman Jayanti: दक्ष राहा, लक्ष ठेवा! रामनवमीच्या हिंसाचारानंतर केंद्राची हनुमान जयंतीनिमित्त सर्व राज्यांसाठी सूचना

सर्व राज्यांना हनुमान जयंतीदरम्यान दक्षता बाळगण्याची सूचना देण्यात आली आहे.

Pramod Yadav

Hanuman Jayanti MHA Advisory: रामनवमीच्या दिवशी बिहार आणि पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये हिंसाचार झाल्यामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहे. देशात 06 एप्रिल रोजी सर्वत्र हनुमान जयंती साजरी होणार आहे. दरम्यान, गृह मंत्रालयाने हनुमान जयंतीबाबत सर्व राज्यांसाठी नियमावली जारी केली आहे. या अंतर्गत, राज्य सरकारांना सण शांततेत साजरा करण्यासह कायदा आणि सुव्यवस्था, तसेच समाजातील जातीय सलोखा बिघडवणाऱ्या घटकावर लक्ष ठेवण्याची सूचना केली आहे.

सर्व राज्यांना या उत्सवादरम्यान दक्षता बाळगण्याची सूचना यापूर्वीच देण्यात आली आहे. यावेळी केंद्राकडून कोणतीही कुचराई खपवून घेतली जाणार नाही. असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

रामनवमीला पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये हिंसाचार

रामनवमीच्या दिवशी बिहार आणि पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये हिंसाचार झाला. रामनवमीपासून सुरू झालेला जातीय हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. त्याचा सर्वाधिक परिणाम पश्चिम बंगालमधील हुगळीत दिसून आला. आताही पश्चिम बंगाल आणि बिहारच्या शहरांमध्ये हिंसाचार भडकताना दिसत आहे.

दुसरीकडे, कलकत्ता उच्च न्यायालयानेही बुधवारी (05 एप्रिल) हनुमान जयंतीबाबत आदेश दिला आहे. उच्च न्यायालयाने बंगाल सरकारला केंद्र सरकारकडून अतिरिक्त बळ मागून घेण्याची सूचना केली आहे. राज्यात पोलिसांची संख्या पुरेशी नसेल तर तुम्ही निमलष्करी दलाची मदत घेऊ शकता. आम्हाला आमच्या नागरिकांची सुरक्षा महत्वाची आहे.

6 एप्रिल रोजी होणाऱ्या हनुमान जयंतीला जहांगीरपुरी परिसरात मिरवणूक काढण्यासाठी पोलिसांनी विश्व हिंदू परिषद आणि अन्य गटाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे दिल्लीत हनुमान जयंतीच्या एक दिवस आधी दिल्ली पोलिसांनी जहांगीरपुरीमध्ये फ्लॅग मार्च काढला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mohammed Siraj: "जा, रिक्षा चालव!", एका अपयशाने 'हिरो' ते 'झीरो'? मोहम्मद सिराजने नेटिझन्सच्या दुटप्पी भूमिकेवर सोडले मौन, म्हणाला...

दोघांमधील भांडण विकोपाला गेले, पत्नीने रागाच्या भरात पतीच्या अंगावर कढईतील उकळते तेल ओतले

Goa News Live: काँग्रेसच्या नेत्यांनीच केले होते विरियातोंविरोधात काम!

'आर्मीकडून 4 लाख महिलांवर सामूहिक लैंगिक अत्याचार, ऑपरेशन सर्चलाईटमध्ये नरसंहार'; भारतानं युएनमध्ये उघडे पाडले पाकिस्तानचे क्रौर्य

Goa Crime: दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; कर्नाटकातील दोन युवकांना अटक, वास्को पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT