Court Dainik Gomantak
देश

''पतीला दरमहा 5 हजार पोटगी द्या''; न्यायालयाने पत्नीला असा का दिला आदेश?

Divorce Case: तुम्ही अनेकदा ऐकले असेल की घटस्फोटाच्या प्रकरणात पोटगीची मागणी केली जाते.

Manish Jadhav

Divorce Case: तुम्ही अनेकदा ऐकले असेल की घटस्फोटाच्या प्रकरणात पोटगीची मागणी केली जाते. पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर पतीला दर महिन्याला काही पैसे द्यावे लागतात, जेणेकरुन तो आपला खर्च भागवू शकेल. अशाच परिस्थितीत मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. येथील फॅमिली कोर्टाने ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेला घटस्फोटानंतर तिच्या 12वी पास पतीला 5000 रुपये मासिक देखभाल भत्ता देण्याचे निर्देश दिले आहेत. 23 वर्षीय अमन कुमारच्या याचिकेचा हवाला देत न्यायालयाने बुधवारी हा निर्णय दिला की, पत्नीमुळे त्याला शिक्षण सोडावे लागले. अमन बेरोजगार आहे, पण त्याची 22 वर्षीय पत्नी पदवीधर असून इंदूरमध्ये ब्युटी पार्लर चालवते.

दरम्यान, याचिकाकर्ता अमन कुमार याचे वकील मनीष जारोळे यांनी सांगितले की, 2020 मध्ये उज्जैन येथील रहिवासी असलेल्या अमनने एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून नंदिनीशी मैत्री केली. काही दिवसांनी नंदिनीने अमनला लग्नासाठी प्रपोज केले. अमनला तिच्याशी लग्न करायचे नसतानाही नंदिनीने त्याला आत्महत्येची धमकी दिली. यानंतर, जुलै 2021 मध्ये, त्यांनी आर्य समाज मंदिरात जावून लग्न केले आणि इंदूरमध्ये भाड्याच्या घरात राहू लागले.

अमनने आपल्या याचिकेत आरोप केला की, लग्नानंतर नंदिनी आणि तिचे कुटुंबीय त्याचा छळ करु लागले. तसेच त्याला पुढे शिक्षण घेण्यापासून रोखण्यात आले. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांनी म्हणजे सप्टेंबरमध्ये अमन नंदिनीला सोडून आई-वडिलांच्या घरी गेला.

दरम्यान, अमन घरातून बाहेर पडल्यानंतर नंदिनीने बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवली. त्यानंतर अमननेही पोलिस ठाण्यात तक्रार देखील केली आणि डिसेंबर 2023 मध्ये घटस्फोट आणि देखभालीसाठी फॅमिली कोर्टात याचिकाही दाखल केली. दुसरीकडे, नंदिनीने इंदूरमध्ये अमनविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता, मात्र न्यायालयासमोर तिने अमनसोबत राहायचे असल्याचे सांगितले.

अमनच्या वकिलाने सांगितले की, 'नंदिनी न्यायालयासमोर खोटं बोलली की ती बेरोजगार आहे आणि अमन काम करतो. तिच्या वक्तव्यात अनेक विरोधाभास जाणवल्याने न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.

वकील मनीष जारोळे म्हणाले की, ''हे एक अनोखे प्रकरण आहे. या प्रकरणी न्यायालयाने नंदिनीला न्यायालयीन खर्च म्हणून अतिरिक्त रक्कम देण्याचे आदेशही दिले आहेत. नंदिनी आणि तिच्या कुटुंबीयांनी अमनसोबत गुन्हेगारी कृत्य केले होते.'' नंदिनीने न्यायालयात सांगितले की, तिला तिचे वैवाहिक जीवन वाचवायचे आहे, त्यामुळे तिने इतक्या गोष्टी सांगितल्या नाहीत, पण आता ती उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

TVS Orbiter: टीव्हीएस करणार मोठा धमाका! ओला-चेतकला तगडी टक्कर देण्यासाठी येतेय 'ऑर्बिटर' VIDEO

Goa Police: खून प्रकरणातील आरोपी, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सहकाऱ्याला गोवा पोलिसांनी कशी अटक केली?

US Mass Shooting: अमेरिकेत कॅथलिक शाळेवर गोळीबार; लहान मुले, शिक्षक अडकले, शूटरला अटक

Asia Cup 2025: यूएईमध्ये भारताची कामगिरी कशी? पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाणा रेकॉर्ड, तरीही टीम इंडिया विजेतेपदाची दावेदार

Viral Video: डॉगेश भाई से पंगा नहीं… ! जंगलाच्या राणीला दिली जबरदस्त टक्कर; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT