तालिबानने (Taliban) अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने सर्व दूतावास (Ambassador) आणि परदेशी नागरिकांना सुरक्षेचे आश्वासन दिले आहे, परंतु सत्य हे आहे की अजूनही अराजकता माजली आहे. निवडक देश वगळता बहुतेक देशांनी काबूलमधील (Kabul) आपले दूतावास बंद केले आहेत आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढले आहे. कोणतीही जोखीम न घेता भारताने (Indian Peoples In Kabul) आपले दूतावास बंद केले आहे आणि राजदूतसह तेथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढले आहे.(Afghanistan's situation was described by Rudrendra Tandon ambassador of India)
मंगळवारी सर्व लोकांना भारतीय हवाई दलाच्या C -17 ग्लोबमास्टरच्या विशेष विमानाने जामनगरमार्गे गाझियाबादच्या हिंडन विमानतळावर आणण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, काबूलमधील बिघडलेली परिस्थिती पाहता दूतावास बंद करण्याचा आणि राजदूत आणि इतर कर्मचाऱ्यांना परत बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे काम दोन टप्प्यांत पूर्ण झाले आहे. दूतावासातील सर्व कर्मचारी आणि इतर भारतीयांना मंगळवारी दुपारी नवी दिल्लीला आणण्यात आले आहे.
मंत्रालयाने म्हटले आहे की यापूर्वीही अफगाणिस्तानमधील बिघडलेल्या परिस्थितीबद्दल सतत इशारे देण्यात आले होते. तेथे राहणाऱ्या भारतीयांना शक्य तितक्या लवकर परत जाण्याचा सल्ला दिला जात होता आणि इतर भारतीयांनी तेथे जाऊ नका. इतर काही देशांसाठी काम करणारे भारतीय अजूनही तेथे असण्याची शक्यता आहे. त्यांच्याविषयी माहिती देण्यासाठी एक विशेष टेलिफोन लाईन उभारण्यात आली आहे.
काबुलमध्ये असलेले भारताचे राजदूत रुद्रेंद्र टंडन, त्यांनी तेथील परिस्थिती सांगताना काबूलमधील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. ते म्हणाले की, अफगाणिस्तानमध्ये आमचे खूप मोठे मिशन होते, जिथे 192 लोक काम करत होते. या सर्वांना गेल्या तीन दिवसांत परत आणण्यात आले आहे.असे स्पष्टीकरण दिले आहे. काबुलमधील परिस्थिती बिघडल्यानंतर ज्या भारतीयांनी दूतावासात आश्रय घेतला होता, त्यांनाही आणण्यात आले आहे. असे असूनही काही भारतीय अजूनही तेथे अडकल्याची शक्यता आहे. त्यांना व्यावसायिक विमानाने आणण्याची व्यवस्था केली जात आहे. एअर इंडिया आपली व्यावसायिक उड्डाणे सुरू ठेवेल, जेणेकरून जे भारतीय येऊ इच्छितात ते परत येऊ शकतील.
राजदूताने हवाई दलाचे आभार मानले
काबूलहून परतल्यावर हवाई दलाचे एक विशेष विमान इंधन भरण्यासाठी जामनगर विमानतळावर थांबले. तिथे टंडन म्हणाले की, देशात परतण्याचा आनंद अकल्पनीय आहे. तसेच सर्व लोकांना सुखरूप आणल्याबद्दल त्यांनी हवाई दलाचे आभार मानले. भारतीय दूतावासाच्या कर्मचाऱ्यांची एक टीम सोमवारी हवाई दलाच्या मालवाहू विमान सी -17 ने परत आणली. काबूल विमानतळाच्या सुरक्षेबाबत चिंता भारतासाठी सध्या सर्वात मोठी चिंता काबूल विमानतळाच्या सुरक्षेची आहे.
अमेरिकन सैनिकांनी वातावरण शांत केले
सोमवारी विमानतळावर दाखल होणाऱ्या हजारोंच्या गर्दीमुळे खूप गोंधळ झाला, पण रात्री उशिरा अमेरिकन सैनिकांनी हळूहळू वातावरण शांत केले. दूतावास आणि मिशनमध्ये काम करणाऱ्यांना ते इजा करणार नाहीत, असे तालिबानकडून वारंवार सांगितले जात आहे. असे म्हटले जाते की तालिबानने अनेक दूतावासांमधून लोकांना त्यांच्या देखरेखीखाली विमानतळावर नेले आहे.
हिंदू आणि शीख आणण्यासाठी प्राधान्य दिले जाईल
परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की अफगाणिस्तानमध्ये अजूनही मोठ्या संख्येने भारतीय अडकले आहेत. यातील काही लोक असे आहेत जे तिथे इतर कंपन्यांसाठी काम करतात. अफगाणिस्तानात हिंदू आणि शीख समाजाचे लोकही मोठ्या संख्येने आहेत. भारताने या लोकांसाठी आपत्कालीन ई-व्हिसाची सुविधा सुरू केली आहे. हिंदू किंवा शीख किंवा अफगाणिस्तान सोडू इच्छिणाऱ्या इतर समुदायाच्या नागरिकांच्या आपत्कालीन व्हिसा प्रस्तावावर प्राधान्याने काम केले जात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.