Aditya L-1 Launch Dainik Gomantak
देश

Aditya L-1 Launch: भारताची सूर्याकडे झेप! आदित्य एल-1चे यशस्वी प्रक्षेपण

दैनिक गोमन्तक

Aditya L-1 Launch: भारताची बहुप्रतिक्षित आणि महत्वाकांक्षी सूर्यमोहिम आदित्य एल-१ चे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रामधून पीएसएलव्ही रॉकेटद्वारे आदित्य एल-1 चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. चांद्रयान 3 नंतर इस्रोची ही यावर्षातील मोठी मोहिम असून ही भारताची ही पहिली सूर्यमोहिम आहे.

आदित्य एल 1 मिशनद्वारे सूर्यावरील घडामोडी, चुंबकीय वादळे, सूर्याभोवतीच्या गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास, प्लाझ्मा गरम होणे, क्रोमोस्पीयर आणि सौर कोरोना यांचा अभ्यास केला जाणार आहे.

हे यान सूर्याच्या बाहेरील थराचा (कोरोना) अभ्यास करेल. आदित्य L-1 हे एक अंतराळयान आहे जे पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असलेल्या सूर्य-पृथ्वी Lagrange पॉइंट L1 भोवती हॅलो ऑरबिटमध्ये ठेवले जाईल.

सूर्य हा अत्यंत गतीशील तारा आहे. सौरमंडलामध्ये अनेक विस्फोटकारी घटना घडतात. जर असे काही विस्फोट सूर्याकडून पृथ्वीकडे आले तर पृथ्वीच्या अवकाशातील वातावरणात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

याआधीदेखील अनेक अंतराळयाने अशा समस्यांचा शिकार बनले आहेत. भविष्यात अशा काही समस्या निर्माण झाल्या तर त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ही मोहिम महत्वाची ठरणार आहे.

सूर्यमोहिमेतून कशाचा अभ्यास केला जाईल?

सूर्य हा पृथ्वीच्या जवळचा तारा आहे. त्यामुळे अन्य ताऱ्यांच्या तुलनेत सूर्याचा विस्ताराने अभ्यास करणे शक्य आहे. सूर्याच्या अभ्यासातून आपल्या आकाशगंगेतील ताऱ्यांविषयी अभ्यास करणे आणि जाणून घेणे सोपे होणार आहे, त्यांचा जीवनक्रम जाणून घेण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर इतर आकाशगंगेविषयीदेखील माहीती मिळवता येणार आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे, आत्तापर्यंत न पाहिलेले अल्ट्राव्हायलेट किरणे आदित्य एल-1 मोहमेद्वारे पाहण्यात येणार आहे. पृथ्वी का तप्त होते, सूर्याच्या किरणांचा पृथ्वीवर काय परिणाम होतो अशा अनेक घटनांचा अभ्यास केला जातो.

एल 1 पॉइंट पर्यंत पोहचण्यासाठी किती दिवसांचा प्रवास?

इस्रोकडून दिलेल्या माहीतीनुसार, एल 1 पॉइंट पर्यंत पोहचण्यासाठी 109 दिवसांचा प्रवास यानाला करावा लागणार आहे. एल 1 हा सूर्य आणि पृथ्वीमधील असा पॉइंट आहे जिथे आदित्य एल 1 स्थिरावणार आहे. हे अंतर 15 लाख कोटी किलोमीटर इतके आहे.

खर्च किती?

आदित्य एल1 चे 400 कोटी इतके बजेट असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, अमेरिका आणि चीन यांच्या आंतराळ मोहिमेपेक्षा भारताच्या सूर्यमोहिमेचा खर्च कमी आहे.

दरम्यान, 2008 पासून या मोहिमेची तयारी सुरु आहे. याआधी देखील अनेक देशांनी सूर्यामोहिमा आखल्या आहेत. आता भारताच्या या सूर्यमोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. आता ही मोहीम यशस्वी होणे भारताइतकेच इतर जगासाठी महत्वाचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT