<div class="paragraphs"><p>Water bottle</p></div>

Water bottle

 

Dainik Gomantak 

देश

पाण्याच्या बाटलीने केला घात, अभियंत्याने गमावला जीव

दैनिक गोमन्तक

कधीकधी एक छोटीशी चूक तुमचा जीवावर बेतू शकते. नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवरही असाच काहीसा प्रकार घडला आहे. कारमध्ये ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीमुळे इंजिनिअरला जीव गमवावा लागला.

दिल्लीत राहणारा अभिषेक झा हा अभियंता आपल्या मित्रासोबत ग्रेटर नोएडाला जात होता. यावेळी त्याची कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. अपघाताचे कारण वाहनातील पाण्याची बाटली असल्याचे पोलिसांनी प्रथमदर्शनी सांगितले.

पोलिसांनी पुढे सांगितले, अभिषेक हा कार चालवत होता. यावेळी सीटच्या मागे ठेवलेली पाण्याची बाटली अभिषेकच्या पायाखालून सरकली. ट्रक जवळ येताच त्याने गाडी थांबवण्यासाठी ब्रेक मारला. मात्र, ब्रेक पेडलखाली पाण्याची बाटली आल्याने ब्रेक अडकला अन् कार ट्रकला धडकली. अभिषेक झा ग्रेटर नोएडा येथील एका कंपनीत नोकरीला होता. अभिषेक आणि त्याचा मित्र दोघेही नोएडाहून ग्रेटर नोएडाला जात होते. सेक्टर 144 जवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन कार धडकली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dam Water : धरणांत पाणी पातळी घटली; सरासरी २ मीटरने जलसाठ्यात घट

Kadamba News : ‘कदंब’चे ‘ते’ कर्मचारी रडारवरच; वन खात्याकडून सखोल तपास सुरू

Konkan Railway : ‘कोकण रेल्‍वे’ करणार केनियाच्‍या रेल्‍वेची कामे : संतोष कुमार झा

Mapusa News : आता सीसीटीव्हींसह रखवालदार गरजेचेच; पोलिस आणि नागरिकांमध्ये हवा समन्वय

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

SCROLL FOR NEXT