Chief Minister Bhagwant Mann Dainik Gomantak
देश

Punjab Government: पंजाबमध्ये आप सरकारला एक वर्ष पूर्ण, CM भगवंत मान यांनी केली 'ही' मोठी घोषणा

Aap Govt Completes One Year: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या सरकारला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले आहे.

Manish Jadhav

Aap Govt Completes One Year: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या सरकारला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले आहे. यावेळी त्यांनी आपल्या सरकारने केलेल्या कामाविषयी सांगितले.

तरुणांना सरकारी नोकऱ्या दिल्या

ते म्हणाले की, 'आमच्या सरकारने दरमहा 300 युनिट मोफत वीज, तरुणांना सरकारी नोकऱ्या आणि मोहल्ला दवाखाने सुरु करणे यासारख्या हमी पूर्ण केल्या आहेत.'

ते पुढे म्हणाले, 'मोठ्या आशेने निवडून आलेल्या आप सरकारने एक वर्ष पूर्ण केले आहे. पंजाबींनी वर्षभरापूर्वी 'आप'ला मोठा जनादेश देऊन इतिहास घडवला होता.'

मुख्यमंत्र्यांनी याविषयी सांगितले

2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत AAP ने 117 पैकी 92 जागा जिंकल्या होत्या. मुख्यमंत्री मान म्हणाले की, 'एका वर्षात 26,797 सरकारी नोकऱ्या दिल्या.'

ते पुढे म्हणाले की, 'राज्यातील 87 टक्के कुटुंबांना शून्य वीज बिल आले आहे. शिक्षण विभागातील 14 हजार अस्थायी कर्मचाऱ्यांच्या (Employees) आणि अन्य विभागातील 14 हजार कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायदेशीर अडथळे दूर करुन 'आउटसोर्स' कर्मचाऱ्यांच्या सेवाही नियमित केल्या जातील.'

शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित केले

शेतीचा संदर्भ देत, मान म्हणाले की, 'मूग पिकावर एमएसपी (किमान आधारभूत किंमत) देण्याव्यतिरिक्त, त्यांच्या सरकारने (Government) भाताच्या थेट पेरणीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रति एकर 1,500 रुपये दिले, तर उसावरील 392 कोटी रुपयांची थकबाकीही भरली.'

मान पुढे म्हणाले की, 'पंजाबमध्ये 500 हून अधिक मोहल्ला क्लिनिक उघडण्यात आले आहेत. 12 ते 15 लाख लोकांनी या केंद्रांचा लाभ घेतला आहे.' ही आपल्या सरकारची महत्त्वाची कामगिरी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ड्रग्ज विरुद्ध मोहीम

2015 च्या कोटकपुरा पोलिस गोळीबाराचा संदर्भ देत, मान म्हणाले की, 7000 पानांचे आरोपपत्र तयार करण्यात आले होते आणि पंजाब पोलिसांच्या विशेष तपास पथकाने केलेल्या तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप नव्हता.

मान शेवटी म्हणाले की, 'आम्ही राज्याला 'रंगला' (व्हायब्रंट) पंजाब बनवण्याच्या दिशेने काम करत आहोत. तुमचा विश्वास मी कधीही गमावणार नाही. सरकार ड्रग्जविरोधात मोठी मोहीम सुरु करणार आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT