Margaret Alva Dainik Gomantak
देश

Vice President Election: मार्गारेट अल्वा यांना आप अन् JMM ने दिला पाठिंबा, मात्र...

Vice Presidential Election 2022: मार्गारेट अल्वा यांना आम आदमी पार्टी (AAP) आणि झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) यांनी पाठिंबा जाहीर केल्याने विरोधकांना बळ मिळाले आहे.

दैनिक गोमन्तक

Vice President Polls 2022: उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांना आम आदमी पार्टी (आप) आणि झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) यांनी पाठिंबा जाहीर केल्याने विरोधकांना बळ मिळाले आहे. संख्याबळ अजूनही त्यांच्या बाजूने आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार जगदीप धनखर यांची एम. व्यंकय्या नायडू यांचा उत्तराधिकारी म्हणून निवड करण्यासाठी 6 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. निकाल त्याच दिवशी येईल. संख्याबळानुसार, धनखर यांच्या बाजूने दोन तृतीयांश मते आहेत, कारण भारतीय जनता पक्षाचे लोकसभेत 303 आणि राज्यसभेत 91 सदस्य आहेत.

दरम्यान, जनता दल (युनायटेड), YSRCP, BSP, AIADMK आणि शिवसेना यासारख्या काही प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याने, NDA च्या उमेदवाराला 515 पेक्षा जास्त मते मिळतील, जी त्यांच्या विजयासाठी पुरेशी आहेत. आतापर्यंत विविध पक्षांनी जाहीर केलेल्या समर्थनाच्या आधारे अल्वा यांना सुमारे 190-200 मते मिळण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसने (TMC) उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. TMC चे लोकसभेत 23 आणि राज्यसभेत 16 खासदार आहेत.

दुसरीकडे, तेलंगणा राष्ट्र समिती आणि तेलुगु देसम पक्ष यासारख्या काही प्रादेशिक पक्षांनी अद्याप त्यांचे कार्ड खोलले नाही. ते लवकरच निर्णय घेऊ शकतात. दिल्ली आणि पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पक्षाने बुधवारी अल्वा यांना पाठिंबा जाहीर केला. पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीने राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर अल्वा यांना पाठिंबा देण्याचा निर्णय एकमताने घेतला. पक्षाने म्हटले आहे की, 'पक्षाचे सर्व राज्यसभा सदस्य 6 ऑगस्ट रोजी विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांना मतदान करतील.'

'आप'चे राज्यसभेत 10 खासदार आहेत

आप चे राज्यसभेत 10 खासदार आहेत, परंतु पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यानंतर भगवंत मान यांनी राजीनामा दिल्यानंतर लोकसभेत त्यांची उपस्थिती नाही. JMM प्रमुख शिबू सोरेन यांनी बुधवारी एका निवेदनात आपल्या खासदारांना 6 ऑगस्टच्या निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री अल्वा यांच्या बाजूने मतदान करण्यास सांगितले. जेएमएमचे एकूण तीन खासदार आहेत - राज्यसभेत दोन आणि लोकसभेत एक. धनखर निवडणुकीपूर्वी पक्षाच्या खासदारांची भेट घेत आहेत.

अल्वा यांनी लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना पत्र लिहिले

मार्गारेट अल्वा यांनी लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व सदस्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीकडे संसदेचे कामकाज नेमके कसे चालते यावर सार्वमत म्हणून पाहिले पाहिजे. त्याचबरोबर महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर एकमत निर्माण करण्याची गरज आहे.'

धनखर आणि अल्वा हे दोघेही राज्यपाल राहिले आहेत

मार्गारेट अल्वा यांनी खासदारांना केलेल्या आवाहनात म्हटले आहे की, 'उपराष्ट्रपती म्हणून निवडून आल्यानंतर मी संसदीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी अथक परिश्रम करण्याची शपथ घेते. राज्यसभेचा अध्यक्ष या नात्याने मी विविध राजकीय पक्षांमध्ये पूल बांधण्यासाठी, राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकमत निर्माण करण्यासाठी आणि संसदेचा अभिमान पुनर्संचयित करण्यासाठी काम करेन.' लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत सहभागी असतात. सध्या लोकसभेत एकूण 543 आणि राज्यसभेत 237 खासदार आहेत. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्षही असतात. धनखर आणि अल्वा हे दोघेही माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री आणि माजी राज्यपाल राहिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fianance Scam: गोव्यात आजवरचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा; गुंतवणुकीच्या नावाखाली 50 जणांना 130 कोटींचा गंडा

Mayem Fire Incident: वायंगिणी-मयेत आगीचा तांडव! 30 लाख रुपयांचे नुकसान; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

Cash For Job: आमच्यावर पोलिसांमार्फत पाळत! सरदेसाई, पालेकरांचा सनसनाटी आरोप

Rashi Bhavishya 25 November 2024: उद्योजकांसाठी आजचा दिवस खास, मिळणार मोठी डील... तुमच्या राशीत दडलंय काय?

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

SCROLL FOR NEXT