Manish Sisodia Dainik Gomantak
देश

PPE किट डील भ्रष्टाचारात आसामच्या मुख्यमंत्र्यांचा हात, AAP ने साधला निशाणा

AAP ने आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर PPE किट डीलमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.

दैनिक गोमन्तक

आम आदमी पक्षाने आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर PPE किट डीलमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शनिवारी आरोप केला की, ''आज मी भाजपच्या एका बड्या नेत्याचा भ्रष्टाचार उघड करत आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मोहल्ला दवाखाने आणि शाळा बांधणे हा भ्रष्टाचार नाही. या नेत्याने आपल्या पत्नीच्या कंपनीला आणि मुलाच्या पार्टनरच्या कंपन्यांना सरकारी खरेदीची कंत्राटे दिली आहेत.''

दरम्यान, 2020 मध्ये आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सरमा (Hemant Biswa Sarma) यांनी आरोग्य मंत्री असताना कोरोनाच्या नावाखाली त्यांनी भ्रष्टाचार केला. यासंबंधीची काही कागदपत्रे देखील एका अहवालातून समोर आली असल्याचा आरोप सिसोदिया यांनी केला. त्यांच्या पत्नीची कंपनी जेसीबी इंडस्ट्रीज आहे. त्यांच्या कंपनीला पीपीई किट पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले होते, मात्र त्यांच्या या कंपनीचा वैद्यकीय क्षेत्राशी काहीही संबंध नव्हता. तेव्हा सरकार (Government) इतर कंपन्यांकडून 600 रुपयांना पीपीई किट विकत घेत असे, परंतु त्यांच्या पत्नीला 990 रुपये प्रति किट खरेदी करण्याचे कंत्राट देण्यात आले.

मनीष सिसोदिया (Manish Sisodia) पुढे म्हणाले की, ''एवढेच नाही तर त्यांच्या मुलाच्या भागीदार जीआरडी फार्मास्युटिकल आणि मेरीटाइम हेल्थकेअर या कंपन्यांनाही हे कंत्राट देण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यांनाही 600 ऐवजी 990 रुपये प्रति किट दराने कंत्राट देण्यात आले होते. पत्नीच्या कंपनीने किटचा संपूर्ण पुरवठा केला नाही, मुलाच्या भागीदाराच्या कंपनीनेही पुरवठा केला नाही, परंतु असे असतानाही भागीदाराच्या कंपन्यांना पुन्हा कंत्राट देण्यात आले आणि ते ही यावेळी 1680 रुपये प्रति किट दराने.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NSA In Goa: गुन्हेगारी कृत्यांवर वचक ठेवण्यासाठी गोवा सरकारने उचलले मोठे पाऊल, राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

Goa Today's News Live: 8.50 कोटी रुपयांची थकबाकी; मुरगाव पालिकेची इंडियन ऑईला कारणे दाखवा नोटीस

Goa Politics: खरी कुजबुज; युतीचा आवेश संपला का?

बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाने गाठले, परदेशातून लग्नासाठी गोव्यात आलेल्या ‘लिओ’चा अपघाती मृत्यू

VIDEO: "वेळीच सुधारणा केली नाही तर..." चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी गौतमचा शुभमन गिलला 'गंभीर' इशारा! सरावादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT