पंजाब विधानसभा निवडणुकीत घवघवीत विजय मिळवल्यानंतर आता आम आदमी पक्ष (आप) गगनात मावेनासा झाला आहे. अरविंद केजरीवाल यांना देशाचे पंतप्रधान बनवणे हे आता आपचे पुढील लक्ष्य आहे. असा खुलासा 'आप'चे राज्यसभा सदस्य आणि पक्षाचे हरियाणा प्रभारी डॉ. सुशील गुप्ता यांनी केला आहे.
'आप'चे खासदार डॉ. सुशील गुप्ता यांनी शनिवारी सांगितले की, 'आप'ने नुकताच पंजाब जिंकला आहे आणि पुढे हरियाणा जिंकण्याच आपचं ध्येय आहे.
हरियाणातील अनेक दिग्गज नेते पक्षाच्या संपर्कात आहेत. डॉ. गुप्ता यांनी पंजाबमध्ये (Punjab) पक्षाला मिळालेल्या घवघवीत बहुमताबाबत जींद जिल्ह्यात आयोजित विजय यात्रेदरम्यान पत्रकारांना सांगितले की, आगामी काळात पक्ष शहरी आणि पंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवणार आहे. त्यांनी भारतीय जनता पक्ष-जननायक जनता पक्ष (भाजप-जेजेपी) आघाडी सरकारवर (Government) निशाणा साधला.
सुशील गुप्ता म्हणाले की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून बलात्काराच्या घटना रोज समोर येत आहेत. रोजगाराचे कोणतेही साधन शिल्लक नाही. तरुण मंडळी ठेच खात आहेत. लूटमार खुलेआम होत आहे. भाजप आघाडी सरकारबद्दल जनतेचा भ्रमनिरास झाला आहे.
पंजाबमध्ये 'आप'ने बड्या राजकीय (Politics) व्यक्तींना धूळ चारली आहे. पंजाबच्या आतापर्यंतच्या इतिहासात 'आप'ने सर्वाधिक आमदार दिले आहेत. राज्यातील जनतेने प्रामाणिक सरकार निवडले आहे.
आगामी काळात हरियाणामध्येही प्रामाणिक सरकार स्थापन होईल, असे ते म्हणाले. वीज, पाणी, रस्ते, रुग्णालये आणि शिक्षणाच्या ज्या सुविधा दिल्लीतील आप सरकार देत आहे, त्याच सुविधा पंजाबमध्येही लोकांना मिळणार आहेत. मोठ्या पक्षांचे नेते 'आप'च्या (AAP) कार्यालयाचे दार ठोठावत आहेत. स्वच्छ प्रतिमा असलेल्या आणि प्रामाणिक व्यक्तींनाच पक्षात सामावून घेण्याचा निर्णयही पक्षाने घेतला आहे.
हरियाणात भाजप (BJP) -जेजेपी युतीचे सरकार जनादेशाच्या विरोधात स्थापन झाले आहे. काँग्रेस पक्ष आतून कमकुवत होत आहे. जिथं तो जिंकतो, तिथेच तो पडून असतो. लोकांना प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेचे सरकार मिळावे आणि प्रत्येक व्यक्तीला मूलभूत सुविधा मिळून त्यांची स्वप्ने साकार व्हावीत यासाठी अरविंद केजरीवाल यांना देशाचे पंतप्रधान बनवणे हे पुढील ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.