Chhattisgarh News| Chhattisgarh IED blast News Dainik Gomantak
देश

Chhattisgarh: नक्षलवाद्यांकडून नारायणपूरमध्ये IED स्फोट; एक जवान शहीद

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी बॉम्बच्या स्फोटात एक जवान शहीद झाला आहे.

दैनिक गोमन्तक

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी बॉम्बच्या स्फोटात एक जवान शहीद झाला आहे. त्याचवेळी एक तरुण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. ITBP 53 बटालियनची टीम रस्त्याच्या बांधकामाच्या संरक्षणासाठी निघाली असता सकाळी 8.30 च्या सुमारास हा स्फोट झाला. राजेंद्र सिंह (Rajendra Singh) असे या शहीद जवानाचे (Soldier) नाव असून जखमी जवानाचे नाव महेश असल्याचे सांगण्यात येत आहे. सोनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धोंडरीबेडाजवळ ही घटना घडली आहे. नारायणपूरचे एसपी सदानंद कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (A Soldier has been martyred in an IED bomb planted by Naxals in Narayanpur Chhattisgarh)

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ITBP 53 बटालियनचे जवान रस्त्याच्या बांधकामाच्या संरक्षणासाठी बाहेर पडले होते. सोनपूर पोलीस ठाण्याच्या धोंडरीबेडामध्ये येताच आयईडी बॉम्बचा स्फोट झाला. ज्यात एक जवान शहीद झाला तर दुसऱ्या जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण परिसरात शोधमोहीम वाढवण्यात आली आहे. (Chhattisgarh IED blast News updates)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT