Chhattisgarh: राज्य सरकारचे कर्मचारी आठवड्यातून फक्त 5 दिवसच करणार काम!

बघेल सरकारने (Baghel Government) जाहीर केले की, यापुढे राज्यातील कर्मचारी आठवड्यातून फक्त पाच दिवस काम करतील. याशिवाय राज्य सरकारने प्रजासत्ताक दिनी इतरही अनेक मोठ्या घोषणा केल्या.
Chhattisgarh CM Bhupesh Baghel
Chhattisgarh CM Bhupesh Baghel Dainik Gomantak
Published on
Updated on

73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारने (Chhattisgarh Government) मोठी घोषणा केली आहे. प्रजासत्ताक दिनी राज्य कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देताना राज्यातील बघेल सरकारने जाहीर केले की, यापुढे राज्यातील कर्मचारी आठवड्यातून फक्त पाच दिवस काम करतील. याशिवाय राज्य सरकारने प्रजासत्ताक दिनी इतरही अनेक मोठ्या घोषणा केल्या. बघेल सरकारने पेन्शनसाठी अंशदायी पेन्शन योजनेचा भाग म्हणून राज्याचे योगदान 10% वरुन 14% करण्याची घोषणा केली. (Baghel Government Announced That State Government Employees Would Work Only 5 Days A Week)

कडधान्य पीक एमएसपीवर खरेदी केले जाईल

यानिमित्ताने सीएम भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी छत्तीसगडच्या (Chhattisgarh) जनतेसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, ''कामगार कुटुंबातील मुलींसाठी मुख्यमंत्री नोनी सशक्तीकरण सहाय्य योजना सुरु केली जाईल, ज्या अंतर्गत लाभार्थ्यांच्या पहिल्या दोन मुलींच्या बँक खात्यात 20-20 हजार रुपये एकरकमी भरले जातील. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी 2022-23 च्या खरीप वर्षापासून मूग, उडीद, तूर आदी कडधान्य पिकांचीही किमान आधारभूत किंमतीवर खरेदी केली जाईल.''

Chhattisgarh CM Bhupesh Baghel
दिल्ली, उत्तर प्रदेशसह 'या' राज्यांमध्ये पुढील 2-3 दिवस कडाक्याची थंडी

राज्यपालांनी पोलिस मैदानावर तर सीएम बघेल यांनी जगदलपूरमध्ये फडकावला तिरंगा

तत्पूर्वी, बुधवारी छत्तीसगडमध्ये प्रजासत्ताक दिन (Republic Day) उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याच्या जनसंपर्क विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल अनुसुईया उईके यांनी 26 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता राज्याची राजधानी रायपूरमधील पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहण केले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बस्तर जिल्ह्याचे मुख्यालय जगदलपूरमध्ये राष्ट्रध्वज फडकवला. तर कोरिया जिल्हा मुख्यालय बैकुंठपूरमध्ये विधानसभेचे अध्यक्ष चरणदास महंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Chhattisgarh CM Bhupesh Baghel
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी नाकारला पद्म पुरस्कार

नक्षलवादी कारवायांमुळे सुरक्षा व्यवस्था कडेकोट ठेवण्यात आली

राज्याच्या नक्षलग्रस्त बस्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी म्हणाले की, ''राज्यातील नक्षलग्रस्त भागात प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले होते. सुंदरराज पुढे म्हणाले की, गेल्या एका वर्षात नक्षलग्रस्त बस्तर क्षेत्रातील करीगुंडम, कोल्लाईगुडा, नहाडी, मिंकापल्ली, पुंगारपाल या अंतर्गत भागात 14 हून अधिक नवीन शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत. ''

ते पुढे म्हणाले की, 'प्रजासत्ताक दिनानिमित्त या शिबिरांच्या आसपासच्या गावांमध्ये तिरंगा फडकवण्यात आला. समारंभ दरम्यान, प्रत्येकाला कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले होते.'

पोलीस महानिरीक्षक पुढे म्हणाले, ''राज्यातील अति नक्षलग्रस्त भागात उभारण्यात आलेल्या या छावण्यांद्वारे या भागात सुरक्षा पुरवली जात असून या भागांमध्ये विकासाचा वेगही वाढला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त नक्षलवादी अशांतता निर्माण करु शकतात, अशी भीती पोलिसांना वाटत होती, हे लक्षात घेऊन सुरक्षा दलांना सरकारी आस्थापने आणि आंतरराज्य सीमेवर दक्षता वाढवण्यास सांगितले होते.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com